Home Breaking News गणपती बाप्पा मोरया! चंद्रपूरमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन;

गणपती बाप्पा मोरया! चंद्रपूरमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन;

गणपती बाप्पा मोरया! चंद्रपूरमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन;
नानाजी नगरमध्ये भांदक्कर कुटुंबीयांकडून खास स्वागत

चंद्रपूर, 27 ऑगस्ट :- संपूर्ण महाराष्ट्रात आज गणेश चतुर्थीचा उत्सव जल्लोषात साजरा होत आहे. चंद्रपूर शहरातही गणपती बाप्पाच्या आगमनाने आनंदाचा, भक्तीचा, आणि एकतेचा माहोल निर्माण झाला आहे. घरोघरी, गल्ली-बोळात बाप्पाचे स्वागत “गणपती बाप्पा मोरया!”च्या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने होत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

नानाजी नगरमध्ये बाप्पाचं आगमन विशेष उत्साहात

विशेषतः नानाजी नगरमधील बंडुराव भांदक्कर यांच्या घरी यंदाही बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. भादक्कर कुटुंबीय गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असून यावर्षी त्यांनी बाप्पासाठी विशेष सजावट, आकर्षक आरास आणि पारंपरिक आरतीचं आयोजन केलं आहे. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी दर्शनासाठी येत असून बाप्पाच्या दर्शनाने भक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे.

बंडुराव भांदक्कर म्हणाले, “गणपती बाप्पा आमच्या कुटुंबात केवळ देव नसून एक जिव्हाळ्याचा सदस्य आहे. वर्षभर त्याच्या आगमनाची वाट पाहतो, आणि जेव्हा तो घरी येतो, तेव्हा जणू संपूर्ण घर उजळून निघतं.”

चंद्रपूर मनपाकडून विशेष तयारी आणि लकी ड्रॉ योजना

चंद्रपूर महानगरपालिकेनेही यंदा गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांची विशेष टीम काम करत आहे.

याव्यतिरिक्त, मनपाने “लकी ड्रॉ” योजनेचीही घोषणा केली आहे. ज्या घरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्या घरांमध्ये लकी ड्रॉ कूपन दिले जाणार आहेत. त्यामधून निवडलेल्या भाग्यवान कुटुंबाला आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. हा उपक्रम गणेशभक्तांमध्ये उत्साह आणणारा ठरतो आहे.

सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा उत्सव

गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा प्रतीक आहे. एकत्र येऊन आरती करणे, प्रसाद वाटणे आणि एकमेकांच्या घरी दर्शनासाठी जाणे – हेच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य आहे.

—–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here