लाकडाची गाडी अडवून मी रस्त्यावर आडवा झोपतो म्हणून दिली धमकी, पोलीस गाडे वर कारवाई करतील कां?
चंद्रपूर :–
चंद्रपूर शहरातील मागील सन 2021 पासून कार्यरत शांती धाम संस्थाच्या माध्यमातून मृतकांचे अंत्यसंस्कार ज्या राहमतनगर ईराई नदी घाटावर केल्या जाते, तिथे आपल्या वडिलांपासून (नरेंद्र गर्गेलवार) अंत्यसंस्कार करिता लाकडं पुरविण्यासाठी लाकडाचा टॉल चालविणाऱ्या स्नेहा गर्गेलवार या मुलीला स्वतःला माजी सैनिक म्हणविणारा संस्थेचा कर्मचारी हरीश गाडे हा वाईट नजर ठेऊन तीला त्रास देत आहे, या संदर्भात मुलीने रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती पण पैशाच्या बळावर उलट मुलीवरच गुन्हे दाखल केल्याने तिने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्याय जनतेसमोर मांडला होता, यावर शांती धाम संस्थेचे अध्यक्ष डॉ, अशोक वासलवार यांनी गाडे वर तात्काळ कारवाई करून त्याला घरी पाठवायला हवे होते मात्र आता तोच गाडे दादागिरीवर उतरला असून मुलीच्या गाडीने लाकडं आणणारी गाडी अडवून मी रस्त्यावर आडवा झोपतो म्हणून मुलीला धमकी दिल्याने येथील अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना या गाडेचा नाहक त्रास होत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना न्यायालयाच्या सुचनेला न मानता तो मुलीवर ज्या पद्धतीने दबाव टाकून तीला मानसीक त्रास देतोय तो महिला अत्त्याचार प्रतिबंधक कायाद्यानुसार गुन्हा असल्याने पोलीस गाडेवर कारवाई करणार कां असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्नेहा गर्गेलवार ही मुलगी वडिलांचा व्यवसाय स्वतः चालवून एक प्रकारे समाजात आदर्श निर्माण करत आहे, कारण जर मजूर नसले तर स्वतःचं लाकडं सरणापर्यंत ती स्वतः पोहचवीत असते, जर प्रेत उशिरा आले तर ती स्वतः उभी राहून मजुराकडून काम करून घेत असतें, पण मुलगी आपल्या मताप्रमाने वागत नाही म्हणून तीला मानसिक त्रास देऊन तिच्याकडून लाकडाचा टॉल काढून घेण्यासाठी हरीश गाडे कटकारस्थान रचत आहे व रामनगर पोलिसांत खोट्या तक्रारी देऊन मुलीला नाहक त्रास देणे सुरू आहे, आता तर तो मुलीच्या लाकडाच्या गाडीला अडवत असल्याने हा किती मुजोर व्यक्ती असेल याची प्रचिती दिसत आहे, दरम्यान हरीश गाडे यांच्यावर झालेल्या कार्यवाहीचा अहवालच आता समोर आला असून त्यांचे चित्र चरित्र जर बघितले तर संस्था सुद्धा त्याला कामावर घेणार नाही अशी गंभीर स्थिती असल्याने आता स्नेहा गर्गेलवार आपल्या सर्व नातेवाईकांना घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात आहे त्यामुळे पोलिसांनी गाडे चा वेळीच बंदोबस्त केला नाही तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.