वरोऱ्यात शिवसेना-भाजप तर चंद्रपूर मध्ये भाजप आमदार आमनेसामने, नगरपरिषद मुख्याधिकारीं व मनपा आयुक्त यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
चंद्रपूर/वरोरा:-
वरोरा शहरात दरवर्षीप्रमाणे गणेश विसर्जन दिनी सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आपली परंपरा जपत ठराविक ठिकाणी स्वागत मंडप उभारते. सलग चार वर्षांपासून ही परंपरा सुरू असताना यावर्षी मात्र नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासनाने घेतलेल्या पक्षपाती निर्णयामुळे स्वागत मंडप उभारणीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप संघर्ष उफाळला आहे. तर चंद्रपूर मध्ये मनपा आयुक्त यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे याच स्वागत मंडपा वरून भाजप च्या दोन गटात संघर्ष विकोप्याला गेला आहे, मात्र शेवटच्या क्षणी लोकलज्जेस्तव 100 मीटर चे अंतर राखून स्वागत मंडपाला परवानगी मिळाली आहे.
खरं तर सत्ताधारी भाजप आमदार यांनी जें म्हटलं तेच प्रशासन करतंय त्यामुळे वरोरा येथे मागील चार वर्षांपासून ज्या ठिकाणी शिवसेना स्वागत मंडप टाकतेय तिथे भाजप आमदार करण देवतळे यांनी आपला भाजप चा स्वागत मंडप उभारला आहे आणि त्यामुळे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी या विरोधात आक्षेत घेतला मात्र मुख्याधिकारी विशाखा शेळखी यांनी हेतुपुरस्पर शिवसेनेला त्यांची परंपरागत जागा नाकारून भाजपला ती जागा दिल्याने सत्ताधाती शिवसेना -भाजप हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आमनेसामने आहे, खरं तर सार्वजनिक गणेश उत्सवात अशा प्रकारचे राजकारणं हे सर्वासामान्यांच्या बुद्धीला पटणारे नाही पण ज्यांची बुद्धीच मुळात कुचकी त्यांना आपली समाजात काय चर्चा होईल याचे भान उरले नाही.
आमदार करण देवतळे विरुद्ध मुकेश जीवतोडे सामना?
वरोरा विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार करण देवतळे विरुद्ध शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे सामना रंगला होता त्यात करण देवतळे यांचा त्यांचे वडील माजी मंत्री संजय देवतळे यांच्या पुण्याईने विजय झाला पण अपक्ष असतांना सुद्धा मुकेश जिवतोडे यांनी जोरदार टक्कर देऊन आपण पण काही कमी नाही हे दाखवून दिले होते, आज पुन्हा वर्चस्वाच्या लढाईत सत्ताधारी आमदार स्वागत मंडप प्रकरणी बाजी मारली खरी पण चुकीच्या पद्धतीने दिसत आहे, वरोरा शहराचा विचार केला तर आमदार करण देवतळे हे नवखे आहेत आणि त्यांचा राजकीय अनुभव कमी आहे पण त्यांच्या सभोंवतालचे जें जुने जाणते आहे त्यांचा आग्रह असल्यामुळे शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या स्वागत मंडपाच्या ठिकाणी मुख्याधिकारी यांना जाणीवपूर्वक मोक्याची तीच जागा मांगून शिवसेनेवर एक प्रकारे कुरघोडी केलेली आहे, ज्यात सत्ताधारी दोन्ही भाजप आणि शिवसेना यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे, पण यामध्ये स्थानिक आमदार करण देवतळे यांनी बाजी मारून एक प्रकारे शिवसेना पदाधिकारी यांना आव्हान उभे केले हे स्पष्ट दिसतं आहे, यामध्ये उद्या काय प्रतिक्रिया निर्माण होईल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार सामना सुरू?
चंद्रपूर शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत स्वागत मांडपावरून कलगीतुरा रंगला असून एके काळी भाऊ-भाऊ म्हणून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुंगनटीवार यांच्या मागे मागे फिरणारे आमदार किशोर जोरगेवार हे आता मुनगंटीवार यांच्याच पुण्याईने आमदार असतांना चिंधीचोर राजकारणं करत आहे, आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याने ते आपल्या गुरुतुल्य स्थानी असलेल्या मुनगंटीवार यांनाच आव्हान करताहेत म्हणजे बरं करता ब्रम्हहत्त्या अशी स्थिती दिसतं आहे, त्यात ते भाजप शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार हे सुद्धा मुनगंटीवार यांचे शिष्य पण त्यांचेवर सुद्धा फितूर झालेल्या आमदार जोरगेवार यांची सावली पडली की काय ते सुद्धा सुधीर मुनगंटीवार सारख्या गुरुतुल्य व्यक्तीला आव्हान देत आहे याचा अर्थ सत्तेची आणि पदाची मस्ती किती माणसाला खालच्या स्तराला आणते आणि नितीमुल्याचा कसा ऱ्हास होत चालला आहे हे विदारक चित्र दिसतं आहे.