लाकडाचे टॉल चाविणाऱ्या स्नेहा गर्गेलवार या महिलेवर मानसिक अत्त्याचार सुरूच.. संस्थेने तीला दिलेल्या नोटीसवर डॉ. गजानन वासलवार अध्यक्ष ?
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात अंत्यसंस्कार करणारी शांती धाम संस्था आता पूर्णतः वादात सापडली असून या संस्थेचे अध्यक्ष नेमके कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण या ठिकाणी लाकडाचा टॉल चालविणाऱ्या स्नेहा गर्गेलवार या महिलेला या ठिकाणाहून काढण्यासाठी नानाविध प्रयत्न करणारे संस्थेचे तथाकथित मंडळ यांनी गर्गेलवार यांना पाठविलेल्या नोटीस मध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून गजानन वासलवार असे नमूद आहे तर संस्थेचे रजिस्ट्रेशन क्रमांक नोटीस वरून गायब आहे. आश्चर्यांची बाब म्हणजे नोटीस च्या खाली जी सही आहे ती पण बोगस असल्याची शक्यता वाटत आहे, एकूणच संस्थेचा खरा रजिस्ट्रेशन क्रमांक संस्थेच्या लेटरपैड वर नसून स्नेहा गर्गेलवार यांना जो नोटीस चा लिफाफा पाठवला त्यांचेवर संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो मुख्य नसून केवळ तात्पुरता क्रमांक आहे, पण शांतीधाम संस्थाच आता हरीश गाडे नामक अशा व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आली आहे ज्यांचा पूर्व इतिहास महिलांच्या बाबतीत कलंकित आहे, मात्र संस्थेच्या लेटरपेड वर जर खरे अध्यक्ष अशोक वासलवार यांचं नाव गायब आहे,तर ही संस्था नेमकं कोण चालवित आहे, याबद्दल शंका यायला लागली आहे.
शहरातील नामावंत लोकांनी एकत्र येऊन सन 1996 मध्ये रजिस्टर केलेल्या संस्थेत चाललेला भ्रष्टाचार आणि पैसे कामाविण्याच्या नादापाई मांडलेला बाजार अर्थात प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार पाहून शांतीधाम संस्थेत नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न उभा ठाकला आहे, आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जिथे अतिशय भावनिक वातावरण असतें आणि स्मशान शांतता असतें त्या संस्थेच्या आवरात एका लाकडाच्या टॉल साठी संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे तथाकथित कर्मचारी गुंडाना तिथे ठेऊन अक्षरशः एका महिलेला एवढा त्रास देत आहे की जणू ती महिला संस्थेची पूर्ण कमाईचं लुटून नेत आहे,
अशातच संस्थेच्या कर्मचारी व त्यांनी ठेवलेल्या भाडोत्री लोकांकडून महिलेसोबत चाललेला अभद्र व्यवहार, त्या टॉल चालविणाऱ्या महिलेला दिला जाणारा मानसिक त्रास यामुळे अंत्यसंस्कार करायला आलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात येत असून त्यांची मानसिकता पण बिघडयला लागली आहे, त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षाचे नावच बदलले गेले असल्यामुळे इथे काय काय भ्रष्टाचार होत असेल याची कल्पना येते, दरम्यान आता या संस्थेचे काळे कारनामे लवकरच समोर येणार असून संस्थाचालक व तेथील कर्मचारी यांचेवर मनी लॉंड्रीन ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे….