Home चंद्रपूर त्या झरपट नदीवर पूल बांधणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा.

त्या झरपट नदीवर पूल बांधणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा.

मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांची मनपा आयुक्ताकडे मागणी.

चंद्रपूर :

शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपट नदीवर मागील दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता, मात्र अगदी दोन वर्षातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या, दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्ताकडे मनसेच्या जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अन्यथा हा धोकादायक पूल खचून अपघात होण्याची शकता आहे असे नमूद केले होते,

मात्र तरीही मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र हा पूल मनसे च्या मागणी मंतर दहा दिवसातच कोसळला त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल पास करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून मनपा आयुक्त यांना दिला आहे, यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचेजिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे कडून दिनांक २८ ऑगस्ट ला मनपा आयुक्त यांना निवेदन देउन लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने हनुमान खिडकी जवळील झरपट नदी वरील पूल खचला तो बांधणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकां अशी मागणी सुद्धा निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here