Home चंद्रपूर संतापजनक :- पडोली पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश हिवसे यांचे झेंडीमुंडी चालविणारे सगे...

संतापजनक :- पडोली पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश हिवसे यांचे झेंडीमुंडी चालविणारे सगे सोयरे आहेत का?

कुणीतरी पत्रकार झेंडीमुंडी जुगाराच्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ काढतो मग पोलीस आंधळे झालेत का?

चंद्रपूर :-

पोलीस विभाग हा जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असतो ही बाब आता हद्दपार झाली असून पोलीस विभाग हा त्यांच्या मनमर्जिनुसार त्यांच्या फायद्यासाठी असतो असा एक नवा ट्रेंड निर्माण झाला आहे, यात काही पोलीस अधिकारी निश्चितपणे अपवाद आहे खरे, पण प्रमाण मात्र फार कमी आहे, जनतेचे हक्क अधिकार पोलीस स्टेशन मध्ये अक्षरशः पायदळी तुडवून मानवाधिकार कायाद्याचं स्वतः पोलीस उल्लंघन करतात तेंव्हा असं वाटतं की खरंच जनतेला स्वातंत्र्य मिळालं आहे का? जेंव्हा क्रांतिकारी भगतसिंग यांना फासीची शिक्षा झाली त्यावेळी त्यांना फासावर चढविण्याआधी लखनऊ च्या एका पत्रकारानी विचारले होते की आपली शेवटची इच्छा काय आहे? त्यावर युवा अवस्थेत असणाऱ्या पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देण्यासाठी तयार असणाऱ्या भगतसिंगानी म्हटले होते की ज्या पद्धतीने इंग्रजानी इंडियन पोलीस ऍक्ट 1860 चा जो कायदा केला, ज्या कायाद्यामुळे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माझ्या निरापराध लोकांना फासावर जावे लागत आहे तो कायदा रद्द करावा हिच माझी शेवटची इच्छा आहे. पण देशातील जनतेचं दुर्भाग्य म्हणावं लागेल आज तोच इंडियन पोलीस ऍक्ट 1860 चा कायदा जशाचा तसा आहे आणि स्वातंत्र्य मिळालं असताना सुद्धा त्याचं कायाद्यानुसार सर्वसामान्य जनतेवर पोलिसाकडून अन्याय केला जातो ही वास्तविकता भयावह आहे…

पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे यांची कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती का? हा विषय संशोधनाचा असला तरी पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेली झेंडमुंडीचे संचालक त्यांचे सगेसोयरे बहुदा असावे अशीच स्थिती दिसतं आहे, कारण पोलिसांचे ब्रीद “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”‘ वाक्याचा धुव्वा उडवून त्यांनी ज्या पद्धतीने झेंडीमुंडी जुगाराला उत्स्फूर्त खेळाचा दर्जा देऊन संरक्षण दिले आहे, ते खरोखरच त्यांच्या अष्टपैलू गुणांना चालना देणारे ठरत आहे, आश्चर्यांची बाब म्हणजे झेंडीमुंडी जुगार जिथे भरतो तिथे एक पत्रकार जाऊन व्हिडीओ काढतो आणि मग झेंडीमुंडी चे कर्तेधर्ते त्या पत्रकाराला ओवाळणी देतो मग ज्या पद्धतीने त्या झेंडीमुंडी जुगाराला आंधळे बनून पोलीस संरक्षण देत असेल त्या झेंडीमुंडी संचालकांकडून ठाणेदार योगेश हिवसे यांना किती किंमत मिळतं असेल हे त्यांनाच माहीत, पण पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे आणि त्याला असलेलं पोलीस संरक्षण हे सामाजिक आरोग्य बिघडविण्याचं काम आहे आणि ते काम ठाणेदार योगेश हिवसे हे निश्चितपणे करतं आहे, पण याला पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांचं पण समर्थन आहे कां हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे, मात्र प्रसारमाध्यंमामध्ये आलेल्या बातम्या पोलिसांकडून गंभीरतेने घेतल्या जात नाहीय हिच खरी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”‘ या ब्रीद वाक्याची होळी पोलिसाकडून खेळली जातेय ही बाब अतिशय गंभीर आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here