येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीची मनसेची जय्यत तयारी,,तुकूम येथे मनसेच्या पक्ष प्रवेशाने अनेक राजकीय पक्षाला हादरे.
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करतं असून शहरात व गाव खेड्यावर पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे, दरम्यान स्थानिक चंद्रपूर शहराच्या तुकूम परिसरात छायाताई हजारें यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी मनसेचा झेंड घेत मनसेत प्रवेश केला आहे, राजकीय वजनदार क्षेत्र असणाऱ्या या प्रभागात मनसेच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना हादरे बसले आहे, सध्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीला लक्ष करून मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे, त्यामुळे अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मनसेचा झेंडा हातात घेत मनसेत प्रवेश करत असल्याने मनसेची ताकत वाढत आहे.
मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील उद्योगात मनसेच्या कामगार संघटना स्थापित होत असून कामगार क्षेत्रात मनसेची मोठी ताकत निर्माण होत आहे अशातच मनसे पक्षात गाव खेड्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जुळत आहे, त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळतं आहे, दरम्यान तुकूम येथील छायाताई हजारें यांच्या नेतृत्वात झालेल्या पक्ष प्रवेशाने तुकूम प्रभागातील महानगर पालिका निवडणूकीचे गणित बदलणार असे संकेत मिळतं आहे, या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांचेसह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, शहर अध्यक्ष पियुष धुपे, राज वर्मा, राजू लांडगे, प्रतीक चिकाटे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.