Home चंद्रपूर धक्कादायक :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललेल्या झेंडीमुंडी जुगारात आमदार जोरगेवार यांचा...

धक्कादायक :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललेल्या झेंडीमुंडी जुगारात आमदार जोरगेवार यांचा माणूस?

झेंडीमुंडी चालविणारे कैलास दुर्गे यांची पत्रकाराला मारहान, पोलिसांनी पत्रकाराची तक्रार घेतली नसल्याने संताप..

चंद्रपूर:-

पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे यांच्या सरक्षणात पडोली क्षेत्रात चाललेली झेंडीमुंडी ही आता पत्रकारांच्या जीवावर उठली आहे, काही दिवसापूर्वी एका पत्रकाराला तू इथे का आलास व व्हिडीओ का काढले असा सवाल करतं झेंडीमुंडी चालक कैलास दुर्गे यांनी पत्रकाराला मारहान केली होती, पत्रकाराने याबाबत पडोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझी तक्रार नोंदवा अशी विनंती पोलिसांना केली, मात्र अगोदरचं हप्ताखोरीचा खेळ पडोली पोलिसांचा सुरू असल्याने पत्रकाराची तक्रार तर नोंदवली नाहीच उलट झेंडीमुंडी चालक कैलास दुर्गे याला याबाबत पोलिसांनी कळवले व या पत्रकाराला काहीतरी देऊन मोकळं कर असे म्हणून प्रकरण थंड बस्त्यात टाकले, आश्चर्यांची बाब म्हणजे या झेंडीमुंडी जुगारात सत्ताधारी पक्षाचा आमदार किशोर जोरगेवार यांचा खास माणूस जय मिश्रा हे झेंडीमुंडी किंग कैलास दुर्गे यांच्या झेंडीमुंडी जुगारात पार्टनर असल्याचा धक्कादायक खुलासा त्याचं पत्रकाराने केला आहे, त्यामुळे पडोली पोलीस स्टेशन हे अवैध धंदेवाईक यांचं आश्रयस्थान ठरत असल्याची परिस्थिती दिसतं आहे,

पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे यांचे अनेक प्रताप आता उघड होऊ लागले आहे, त्याचा समाचार घेतला जाईलच पण चक्क सत्ताधारी आमदार किशोर जोरगेवार यांचा माणूस जय मिश्रा झेंडीमुंडी जुगारात पार्टनर असल्याने कैलास दुर्गे यांची दादागिरी वाढली आणि त्यांनी पत्रकारला मारहान केली असतांना ठाणेदार हिवसे हे गप्प आहे, पण ठाणेदाराला आमदाराचे पाठबळ मिळते म्हणून अवैध धंदेवाईक यांना ते सरक्षण देत आहे का? यामध्ये मिळणारे हप्ते यामध्ये आमदाराची माणसे सहभागी आहे का? हे प्रश्न अनुत्तरीत असले तरी पोलिसांनी अवैध धंदे चालविणाऱ्या लोकांना संरक्षण आणि पत्रकारांना मारहान केल्यानंतर त्यांची साधी तक्रार सुद्धा नोंद करून न घेण्याची चालवलेली थट्टा बघून या पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत बिहार राज सुरू आहे का? असा प्रश्न उपास्थित होत आहे. दरम्यान सत्ताधारी आमदार यांची माणसे आणि अवैध धंदेवाईक यांची चाललेली भागीदारी सामाजिक आरोग्य बिघडवत असेल तर पोलिसांनी त्याबाबत सजग व्हायला हवं, मात्र इथे तर त्यांचं संरक्षण सुरू आहे, याचा अर्थ पडोली पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेला खरंच इथे न्याय मिळतं असेल का हा गंभीर प्रश्न आहे, दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिस्थिती आटोक्यात आणावी नाहीतर इथे बिहार राज निर्माण होईल अशी परिस्थिती दिसत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here