📰 मराठा कुणबीकरणाच्या विरोधात आवाज बुलंद! चंद्रपूरात सकल ओबीसी महामोर्चाची आढावा बैठक २५ सप्टेंबरला
🔷 जय ओबीसी – जय संविधान!
चंद्रपूर 19, सप्टेंबर 2025 :- मराठा समाजाच्या कुणबी (OBC) करणास विरोध करणाऱ्या आंदोलनाला अधिक ताकद देण्यासाठी सकल ओबीसी समाज, चंद्रपूर यांच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे.
✍️ News reporter :- अतुल दिघाडे
➡️ दिनांक: २५ सप्टेंबर २०२५ (गुरुवार)
➡️ वेळ: दुपारी २ वाजता
➡️ स्थळ: जोडदेऊळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर
ही बैठक येत्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूरमध्ये निघणाऱ्या भव्य ‘सामाजिक न्याय महामोर्चा’ची पूर्वतयारी म्हणून घेतली जात आहे.
🗓️ २ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाने घेतलेल्या मराठा समाजाच्या OBC (कुणबी)करणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हा महामोर्चा यशवंत स्टेडियम ते संविधान चौक, नागपूर (अंतर ३ कि.मी.) पर्यंत भव्य स्वरूपात निघणार आहे.
📢 चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी, भटके-विमुक्त समाज बांधव, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांना या आढावा बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
“आता नाही तर कधीच नाही!”
सकल ओबीसी समाज, चंद्रपूर
https://shorturl.fm/bpLD7