WCL प्रकल्पामुळे पुनर्वसित सिनाळा, मसाळा व नवेगाव गावांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित 8 मागण्यांवर अखेर तोडगा!
— सामाजिक कार्यकर्ते शुभम गेडाम यांच्या पाठपुराव्याला यश, कंपनीकडून 5 मागण्यांना तत्काळ मान्यता व उर्वरित 3 मागण्या 7 दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन
चंद्रपूर, 21 सप्टेंबर 2025 :- WCL दुर्गापूर ओपन कास्ट प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली सिनाळा, मसाळा (जुना) आणि नवेगाव ही गावे गेल्या 7-8 वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत होती. पिण्याच्या पाण्यापासून ते रोजगार, सीमांकन, गावासाठी स्वच्छता निधी व स्थानिक विकासाच्या विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. अखेर सामाजिक कार्यकर्ता व माजी आदिवासी महामंत्री श्री. शुभमभाऊ गेडाम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर WCL प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले असून, 8 प्रमुख मागण्यांपैकी 5 मागण्यांना तत्काळ मान्यता देऊन काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. उर्वरित 3 मागण्या देखील येत्या 7 दिवसांत पूर्ण करण्यात येतील, असे WCL उपक्षेत्रीय महाप्रबंधकांनी स्पष्ट केले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
सदर मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
1, पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा सुरू करणे 2, स्थानिक बेरोजगार युवकांना प्रकल्पातील रोजगार 3, गावे स्वतंत्र गट ग्रामपंचायत म्हणून घोषित करणे 4, गोंडवाना गोटूल (आदिवासी पैठाणा स्थळ) साठी अडथळेविना NOC देणे 5, गावाच्या सुरक्षेसाठी 400 व्हॉट हॅलोजन लाईट लावणे 6, गावांचे सीमांकन 7, 22 दुकानदारांना दुकान जागेचा तात्काळ हक्क 8,स्वच्छतागृहासाठी 75,000 रुपयांची नियोजित रक्कम
ग्रामस्थांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदनावर केवळ 2 तासांत लेखी उत्तर देण्यात आले असून, हा निर्णय गावकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला मोठे यश मानले जात आहे.
https://shorturl.fm/JmXwt