Home भद्रावती क्राईम:- भद्रावती येथील दुय्यम निबंधक राहुल झाडे यांचे बोगस विक्रीचे भ्रष्ट प्रताप...

क्राईम:- भद्रावती येथील दुय्यम निबंधक राहुल झाडे यांचे बोगस विक्रीचे भ्रष्ट प्रताप रडारवर?

बनावट कागगपत्राच्या आधारे विक्री पत्र करण्याच्या प्रकरणी लवकरच होणार खुलासा..

भद्रावती :-

मागील एक वर्षांपासून भद्रावती मध्ये दुय्यम निबंधक पदावर काम करतांना अनेक प्रकरणात बनावट कागदपत्राच्या आधारे जमिनीची खरेदी विक्री नोंदणी करणारे दुय्यम निबंधक राहुल झाडे यांचे कित्तेक प्रकरण आता समोर आले असून एका प्रकरणात संयुक्त वारसान असलेल्या शेत जमिनीपैकी एक हिस्सा उर्वरित वारसान यांची संमती न घेता परस्पर विक्री पत्र केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणात दुय्यम निबंधक राहुल झाडे यांचेवर निलंबानाची कारवाई होण्याची स्थिती निर्माण झाली आहे, दरम्यान स्वतः त्या शेत जमिनीची बनावट कागदपत्राद्वारे विक्री केल्यानंतर एका महाशयाने पुन्हा त्या शेतजमिनीची विक्री रद्द करण्याची पण नोंदणी दुय्यम निबंधक झाडे यांचेकडून करून घेतली, पण आश्चर्यांची बाब म्हणजे स्वतःच त्या जमिनीचे दोन व्यवहार केल्यानंतर परत ती शेतजमीन दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून देण्याची विंनती त्याचं महाशयाने झाडे यांना केल्यानंतर आपण आता बोगस विक्री केली याची जाणीव झालेले झाडे यांनी त्या शेतीची पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून देण्यास मनाई केली आणि बिंग फुटले.

भद्रावती दुय्यम निबंधक कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून राहुल शामदेव काळे हा व्यक्ती नेहमीच दुय्यम निबंधक यांच्या भूमिकेत दिसत असतो, यांच्यापुढे दुय्यम निबंधक हे फक्त सह्या करण्यासाठीचं असतात कारण विक्रीचा दस्त तयार करायचा आणि त्यात काय काय लिहायचं हें सगळं काम कॉम्पुटर ऑपरेटर राहुल काळे करतं असतात आणि कुणाकडून किती पैसे घ्यायचे ते हेच ठरवतात, दरम्यान भीमराव कांबळे हे महाशय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे त्यांचा रोल पण महत्वाचा आहे, बाहेर दलाल आतमध्ये दलाल आणि जमिनीचे अवैध व्यवहार हा तमाशा इथे नेहमीच दिसतो, त्यातच या तमाशातले एक वर्षांपासून हिरोगिरी करण्यासाठी दुय्यम निबंधक राहुल झाडे हें महत्वाची भूमिका निभावून अवैध विक्रीच्या माध्यमातून लाखोंचे वारेन्यारे करतं असतात, या संदर्भात आता नवनवे खुलासे येत असून या प्रकरणात झाडे, काळे आणि कांबळे तिघेही रडारवर आहेत आणि यांच्या भ्रष्ट प्रतापाचा पुराव्यासह खुलासा लवकरच होणार असल्याची माहिती आहे.