Home Breaking News 27 जुलै च्या गडचांदूर जनता कर्फ्यू बाबत संभ्रम कायम

27 जुलै च्या गडचांदूर जनता कर्फ्यू बाबत संभ्रम कायम

गडचांदूर विशेष प्रतिनिधी:- नगराध्यक्षा सौ सविता सुरेश टेकाम यांच्या द्वारे आवाहन करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू चा गोंधळ थांबल्या थांबत नाही आहे. आज नगरपरिषद येथील हॉल मध्ये सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत झालेल्या व्यापारी असोसिएशन आणि नगर परिषद पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये बराच वाद निर्माण झाला.
नगराध्यक्षांनी आदेश दिला असे वायरल झाल्यामुळे आधी माफी मागा व नंतर चर्चेस सुरुवात करू असे व्यापाऱ्यांनी बजावले. पक्षाच्या अध्यक्षाची होत असलेली नाचक्की पाहून काही पक्षनिष्ठ व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण दिलगिरी वर गुंडाळले.
काही व्यापाऱ्यांनी तीन दिवसीय बंद मध्ये होत असलेल्या नुकसानीची भरपाई बाबत मागणी केली. सद्यस्थितीमध्ये कोरोना योद्धा सफाई कामगार यांचे मासिक वेतन चार-सहा महिने होत नसल्याची जाण असलेल्या पदाधिकाऱ्यांनी विषय शिताफीने इतर चर्चेकडे वळविला. बरेच वाद विवाद खलबते झाल्यावर सदर जनता कर्फ्यू दोन दिवस राहील असे जाहीर करण्यात आले.इकडे व्यापाऱ्यांची मिटिंग सुरु असताना अल्पसंख्यांक विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत सोशल मीडिया वरून विरोध सुरू केला.
संध्याकाळला अचानक उप विभागीय अधिकारी राजुरा श्री लोंढे यांनी नगर परिषद येथे नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत कोरुना आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीमध्ये तीन दिवसीय कडक लाक डाऊन व त्यानंतर चार दिवसीय नियंत्रित लॉक डाऊन बाबत निर्णय घेण्यात आला. सदर लाकडाऊन हा 28 जुलै पासून सुरु होत असल्याची चर्चा शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली.
28 जुलैपासून पुढे जिल्हाधिकारी तर्फे लॉक डाऊन होत असेल तर नगराध्यक्षांचे आवाहनावर जनता कर्फ्यू रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा प्रमुख महालिंग कंठाळे यांनी केलेली आहे.
27 जुलै च्या जनता कर्फ्यू बाबत आता कुणीही बोलण्यास तयार नाही.
जनता कर्फ्यू ला विरोध करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी सांगतील तर करू अशी बतावणी केली होती परंतु आता अधिकार्‍यांचे आदेश धडकण्याचा मार्गावर असल्याने आता काय??? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
27 जुलै रोजी नगराध्यक्षांच्या आव्हानावर जनता कर्फ्यू मुळे बरेच जीवनावश्यक वस्तू दूध भाजीपाला इत्यादींची आवाक गडचांदूर ला होणार नाही. पुढे 28 पासून शासकीय लोक डाऊन झाल्यास निश्चितच गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता गडचांदूर कर यांनी व्यक्त केली आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here