Home Breaking News राजुरा पोलिस कोरोनाच्या विळख्यात – दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह पोलीस वसाहतीत भीतीचे वातावरण

राजुरा पोलिस कोरोनाच्या विळख्यात – दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह पोलीस वसाहतीत भीतीचे वातावरण

राजुरा विशेष प्रतिनिधी:- शहरातील दोन पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असुन ह्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार आज मिळालेल्या वैद्यकीय अहवालानुसार इथे कार्यरत 2 कर्मचारी अ‍ॅण्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असुन दोघांनाही वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूर येथिल कोविड केंद्रात पाठविण्यात आले आहे.

दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 428 तर 261 कोरोनातून बरे ; 165 वर उपचार सुरु, 24 तासात नव्या 23 बाधितांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 428 झाली आहे. 261 बाधित बरे झाले असून 165 बाधितावर उपचार सुरू आहेत. तेलंगाना येथील एका महिलेचा 24 जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोना शिवाय अन्य आजाराच्या गंभीरते मुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या (426 + 2 ) 428 झाली आहे.

सायंकाळी पुढे आलेल्या 5 बाधितामध्ये राजुरा येथील पोलिस वसाहतींमध्ये राहणाऱ्या 53 वर्षीय पोलिस जवानाचा समावेश आहे. त्यांचा स्वॅब 27 जुलैला घेण्यात आला होता. टेस्टमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

माजरी येथील रहिवासी असणाऱ्या रामागुंडम तेलंगाना येथून परत आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संस्थात्मक अलगीकरणात त्यांची चाचणी करण्यात आली.

बल्लारपूर येथील गणपती वार्डमध्ये निवासी असणाऱ्या 28 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाटणा समस्तपूर येथून त्यांनी प्रवास केला होता.

घुग्घुस शहरातील रहिवासी असणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला संपर्कातून बाधित झाली आहे.

चिमूर येथील बामणी या गावचे रहिवासी असणारे 33 वर्षीय व्यक्तीदेखील अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यांना श्वसनाचा संदर्भात आजार होता.

तत्पूर्वी ,आज पुढे आलेल्या 18 बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका (6) गडचांदूर (3) चिमूर तालुका (3) बल्लारपूर शहर (2) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (3) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण 18 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत 403 असणारी बाधितांची संख्या आज 428 झाली आहे.

काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत पुढे आलेल्या बाधितामध्ये बल्लारपूर शहरातील कागज नगर येथून परतलेल्या 28 वर्षीय युवकांचा समावेश आहे. बाहेरून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेल्या युवकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

दुसरा युवक 30 वर्षीय असून वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. वाराणसी वरून आल्यानंतर गृह अलगीकरणात ठेवलेल्या युवकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टीचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका विवाह सोहळ्यासाठी या दोघांनी यवतमाळ येथून प्रवास केला होता.

चिमूर येथील इंदिरा नगर चेंबूर येथील 28 वर्षीय महिला धामणगाव येथून प्रवास करून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होती. पॉझिटिव्ह ठरली आहे.

नागपूर येथून प्रवास केल्याची नोंद असलेल्या सिंदेवाही येथील 45 वर्षीय महिला व तिचे 24 व 19 वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत.

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 20 वर्षीय चेन्नई येथून प्रवासाचा संदर्भ असणारा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.

सिंदेवाई तालुक्यातील गुंजेवाही येथील रहिवासी असणारा 20 वर्षीय युवक हा देखील चेन्नई येथून परतला होता.संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या या युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.

सिंदेवाही शहरातील रहिवासी असणारा नागपूर येथून परतलेला 17 वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह आला आहे.

गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक चार मधील 15 वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.

गडचांदूर येथीलच लक्ष्मी थेटर जवळील रहिवासी असणारा 42 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटीव्ह ठरला आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील 60 वर्षीय व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील पैनगंगा पोलिस कॉर्टर परिसरातील 49 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे.

हैदराबाद येथून परतलेला 43 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या चंद्रपूर शहरातील रयतवारी येथील या व्यक्तीचा 25 तारखेला स्वॅब घेण्यात आला होता.

याशिवाय जटपुरा वार्ड येथील संपर्कातून 48 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. या महिलेचा पती देखील पॉझिटिव्ह ठरला होता .

याशिवाय तेलंगणा राज्यातील काजीपेठ वारंगल येथील रहिवासी असणारा 65 वर्षीय व्यक्ती चंद्रपूर येथे आल्यानंतर पॉझिटिव्ह ठरला आहे. अन्य राज्यातील या रहिवाशांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Previous article27 जुलै च्या गडचांदूर जनता कर्फ्यू बाबत संभ्रम कायम
Next articleअनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालय चंद्रपूर मधे सुरु करा, छोटूभाई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here