अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व नौकरी करणाऱ्यांची गडचिरोली ला होत आहे पायपीट .
चंद्रपूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे नागरिक राहत असून त्यांना आपल्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी करिता कार्यालय नसल्याने गडचिरोली येथे जावे लागत आहे, जेव्हा की चंद्रपूर येथे कार्यालय उपलब्ध करून देण्याकरिता 13 सप्टेंबर 20 19 ला शासनाने अध्यादेश काढून चंद्रपूर येथे सहायक आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती जात पडताळणी समिति कार्यालय ला शासनामार्फत आदेश काढून मान्यता दिलेली आहे व कार्यालयाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करिता वर्तमानपत्रात जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी नोकरी करिता सहाय्यक आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली येथे अर्ज सुद्धा केलेले आहे परंतु त्याची अजून पर्यंत अमलबजावणी झालेली नाही.
अनुसूचित जमाती जात पडताळणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील सर्व विद्यार्थी व लोकांना गडचिरोली येथे जावे लागते. परंतु कोविड 19 नुसार माहे मार्च 20 20 ते आतपर्यंत जिल्हा बंदी असल्यामुळे गडचिरोली ऑफिसला जाता येत नाही जात पडताळणी प्रमाणपत्र करिता जावयाचे असल्यास जिल्हा बाहेर जाण्याकरिता परवानगी घेऊन जावे लागते सध्या शासकीय बसेस बंद असल्यामुळे खाजगी वाहन किरायाने करून व एक दिवसाची परवानगी घेतल्यानंतर जाता येते त्याकरिता खाजगी वाहनाचे भाडे वरोरा ते गडचिरोली अंदाजे 3500 रुपये द्यावे लागते प्रमाणपत्राची तपासणी करावयाची असल्यामुळे गडचिरोली कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांना जाणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या कोविड 19 मुळे सर्व काम धंदे बंद आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली कार्यालयात जाण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. जात तपासणी प्रमाणपत्र नसल्यामुळे पुढे नोकरी किंवा इतर महत्वाचे कामाकरिता आदिवासी बांधवांना अडचण निर्माण होणार आहे तरी वरील परिस्थितीचा विचार करून चंद्रपूर येथे सहाय्यक आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालय सुरू करण्यात यावे याकरिता विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा पालकमंत्री चंद्रपूर. यांना छोटू भाई यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून सदर मागणी करण्यात आली, यावेळी पालकमंत्री महोदयांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल येईल असे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत बाळूभाऊ धानोरकर खासदार यांना पाठवण्यात आली याप्रसंगी शेख जैरुद्दीन छोटू भाई सभापती बांधकाम वरोरा तथा.जिल्हा अध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब भाई हसन. हाजी हारून भाई कमलेश बांबोडे माणिक शेंडे सचिन ढवसे.मुन्ना पाठक यावेळी निवेदन देताना उपस्थित होते