Home कोरपणा सणसणीत :- ११ लोकांना संक्रमित करणाऱ्या बेपर्वा बाधितावर गुन्हा दाखल, मग नगरपरिषद...

सणसणीत :- ११ लोकांना संक्रमित करणाऱ्या बेपर्वा बाधितावर गुन्हा दाखल, मग नगरपरिषद प्रशासनावर का नाही ?

गडचांदूर शहरात कोरोना संक्रमण होण्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया.

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर येथे अमरावती वरून दाखल झालेल्या कोरोना बाधिताच्या बेजबाबदारपणाने शहरातील 11 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी आहे.मात्र नगरपरिषद प्रशासनाने या संदर्भात काळजी घेतली नसल्याने व सदर इसमाला परस्पर सोडून दिल्याची चर्चा असल्याने नगरपरिषद प्रशासन सुद्धा याकरिता दोषी असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल का करण्यात येत नाही ? हा प्रश्न शहरात विचारल्या जात आहे. एकीकडे नगरपरिषद प्रशासन सदर बाधित कोविड केअर सेंटर मधून परस्पर निघून गेल्याचे सांगून बाधितावर व संबंधित कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाधित हा अमरावती वरून एका खाजगी वाहनाने गडचांदूर शहरात दाखल झाला.त्यानंतर तो स्वतःची कोरोना तपासणी करिता सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर येथे असलेल्या कोविड केअर सेंटर येथे पोहचला.परंतु आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा योग्य पत्ता व दूरध्वनी क्रमांक न घेता परस्पर त्याला सोडून दिल्याची आरोप अगोदरच भाजप कार्यकर्त्या कडून करण्यात आला होता.गडचांदूर शहरामध्ये नगरपरिषदे द्वारा संस्थात्मक विलगीकरनाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु सदर नागरिक कोविड केअर सेंटर मधून परस्पर बाधित निघून गेला कसा ? आणि जर गेला तर त्याचा शोध नगरपरिषद प्रशासनाने त्याक्षणी का केला नाही ? वा पोलीस विभागाला माहिती का दिली नाही ? मोठा प्रश्न असून आपली कमजोरी लपविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने बाधिता ला लक्ष केल्याची चर्चा होत आहे.या पूर्वी सुद्धा नगरपरिषद प्रशासनाच्या चुकीने औरंगाबाद ते नागपूर ते गडचांदूर आलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुबियांवर गुन्हा दाखल केला होता. आणि आता सुद्धा
एका रुग्णामुळे कोरोना संसर्गाची बाधा झाली त्यामुळे सदर इसमावर व त्याच्या नातेवाईकावर माहिती लपविणे,स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे या अंतर्गत साथरोग प्रतीबांधक कायदा 1867 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 (51-ब ), भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188,269,271 , 290 या अंतर्गत एकूण 3 व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जी नगरपरिषद प्रशासनाची कमजोरी आहे का ? हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here