Home गडचिरोली भ्रष्टाचार :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केलेला संयुक्त वन व्यवस्थापन...

भ्रष्टाचार :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केलेला संयुक्त वन व्यवस्थापन समितीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस ?

25 हेक्टर मधील झाडेच गायब केल्यानंतर आता संयुक्त वन व्यवस्थापन समिती चा साहित्य खरेदी घोटाळा आला समोर.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या साहित्य खरेदी व इतर चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आल्याने मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी सन २०१९ मध्ये कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या जाबुळखेडा वन क्षेत्रात जवळपास २५ हेक्टर मधे जिल्हा विकास योजनेंअंतर्गत अंदाजे २७५०० झाडे लावल्याचे दाखवले मात्र ती झाडेच गायब असल्याचा प्रकार प्रत्यक्ष पाहणी नंतर समोर आला होता त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचे बिंग फुटले. मात्र आता संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना विशेष अधिकार दिल्याने त्या समित्यांमार्फत साहित्य खरेदी व इतर खर्च दाखवून लाखो रुपयाची अफरातफर केली गेली असल्याची माहिती असून जर हा भ्रष्टाचार समोर आल्याने सोनटक्के यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा वन परिक्षेत्रातील गेवधई व गोठणगाव या गावाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना अंधारात ठेवून कुठलेही ठराव न घेता साहित्य खरेदी व इतर खर्च केला आहे तर दुसरीकडे लेंडारी या गावातील मनोज आत्माराम मातोरे यांच्या नावाने अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर क्रमांक M H 37- G9493 या ट्रक्टर ला जब्त केले व गुन्हे दाखल झाले पण त्यांच्याकडून 50 हजार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुरखेडा वन परिक्षेत्र हे वन परिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या मुळे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे असे चित्र दिसत असल्याने आता या क्षेत्रातील संपूर्ण विकास कामे व इतर झाडे लावण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here