Home गडचिरोली भ्रष्टाचार :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या पुन्हा भ्रष्ट कहाण्या ? लघु...

भ्रष्टाचार :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या पुन्हा भ्रष्ट कहाण्या ? लघु पाटबंधारे विभागाच्या कामात चीरीमीरी ?

सोनटक्के यांनी कुरखेडा वनपरिक्षेत्रात पसरविले भ्रष्टाचाराचे जाळे ?

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्र आता भ्रष्टाचारात अव्व्वल दर्जाचे ठिकाण बनले असून वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के हे त्या क्षेत्राचे जणू लिलाव करणारे अधिकारी बनले की काय ? अशीच एकूण परिस्थिती आहे. विशेष म्हणजे आपल्या वाटेत येणारे अडथळे लिलया बाजूला सारण्यात तरबेज असलेले सोनटक्के यांनी एकछत्री आपले वनराज्य निर्माण करून वन विभागाला चुना लावण्याचे काम सुरू ठेवले आहे.
एकीकडे 25 हेक्टर मधे रोपवन न लावता केवळ काही ठिकाणी खड्डे खोडून रोपवन चा लाखो रुपया हडपण्याचे काम केले तर दुसरीकडे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना कुठलीही माहिती व ठराव न घेता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्यानंतर आता कक्ष क्र 1120 C.P.F मधील नाल्यावर कोल्हापुरी सिमेंट बंधारा बांधण्याचे काम वनपरिक्षेत्रात लघु पाटबंधारे विभागामार्फत सुरू आहे त्याला नियत क्षेत्र चांदागड मधील बंधारे बांधकामात वनविभागाची परवानगी नसल्यामुळे बेकायदेशीर काम म्हणून 3 लाख रुपये वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी घेतले असल्याची चर्चा आहे, यानंतर सुद्धा सोनटक्के यांच्या नवनव्या भ्रष्ट कहाण्या समोर येत असल्याने त्यांच्या भ्रष्टाचाराची मालिका सतत सुरू असेल असेच चित्र आहे.

Previous articleभ्रष्टाचार :- कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केलेला संयुक्त वन व्यवस्थापन समितीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस ?
Next articleखळबळजनक :- कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू, जिल्हाधिकारी कार्यालयातील एकूण चार जण बाधित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here