Home आंतरराष्ट्रीय आनंदाची बातमी :- कोव्हिड-19 अजारावरील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने...

आनंदाची बातमी :- कोव्हिड-19 अजारावरील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने शोधली लस.

 

कोव्हिड-19 आजारावरील लशीचे 10 कोटी डोस 2021 सालाच्या सुरुवातीपर्यंत बनवणार असल्याची माहीती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली.

कोरोना स्पेशल :-

संपूर्ण जगात कोरोना ह्या महाभयंकर व्हायरस ने थैमान घातले असून त्यावर अजून पर्यंत कुठलेही औषध तयार करण्यास शास्त्रज्ञ यशस्वी झाले नसताना
कोव्हिड-19 अजारावरील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने लस शोधण्यास यश मिळवले असून कोव्हिड-19 आजारावरील लशीचे 10 कोटी डोस 2021 सालाच्या सुरुवातीपर्यंत बनवणार असल्याची माहीती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली आहे.
पुनावाला यांनी प्रसिद्धी पत्रक काढून ही माहीती दिली आहे. भारतासह कमी राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोना लशीचे हे डोस पाठवले जाणार आहेत. यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किमंत 225 रुपये.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने 10 कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे.गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत 15 कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत.या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे 225 रुपये असणार आहे. 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे.

ऑक्सफर्डच्या लशीची भारतात मानवी चाचणी
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोव्हिड-19 वर युकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे.

पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला या चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या पाहता DCGI ने ही मंजुरी दिली आहे.

या चाचण्यांसाठी निवडण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांना महिन्याभराच्या अंतराने दोनदा लस टोचली जाईल. त्यानंतर त्यांच्या अँटीबॉडीजची चाचणी केली जाईल.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या या लशीचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूटतर्फे केलं जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने यासाठी एस्ट्राजेनेका या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या लशीला त्यांनी कोविशिल्ड असं नाव दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here