Home चंद्रपूर स्व. डॉक्टर टेकाम यांना शहीद दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबाला नोकरी व 50...

स्व. डॉक्टर टेकाम यांना शहीद दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबाला नोकरी व 50 लाख विमा योजनेचा लाभ द्या,

 

छोटू भाई यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली मागणी,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोविड सेंटर मधे बाधितांवर उपचार करता करता डॉक्टर टेकाम है कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना ची लागण झाली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला,त्यामुळे कोरोना च्या लढाईत शहीद झाले असल्याने त्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा व त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीचे निवेदन छोटू भाई शेख यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिली आहे.

वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे सेवेत असताना वरोरा कोविंड सेंटरमध्ये ते सेवा देत असताना कोरोना चे रुग्ण तपासणी करताना संपर्कात आलेल्या रुग्णांमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसापूर्वी खूप कमी वयात डॉ.टेकाम सारख्या चांगल्या डॉक्टरांचा उपचारांदरम्यान चंद्रपूर शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून वयाच्या 31व्या वर्षी सेवा देत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले आणि घरचा कमावता व्यक्ती मृत्यू पावल्यामुळे आर्थिक संकट सुद्धा त्यांच्या कुटुंबावर आले आहे तरी मनमिळावू उत्कृष्ट सेवा देणारे स्व. डॉक्टर टेकाम यांना शहीद दर्जा देण्यात यावा व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी व पन्नास लाख रुपये विमा योजनेचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस च्या वतीने निवेदन देवून करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा छोटू भाई शेख. हाजी हारून भाई आदिवासी नेते प्रमोद बोरीकर. काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोसिम. भाई.पठाण शब्बीर असंघटित कामगार.काँग्रेस शहराध्यक्ष वरोरा बल्लारशा तालुका अध्यक्ष फारुख भाई एवढे उपस्थित होते.यावेळी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले, सदर निवेदनाची प्रत खासदार बाळु धानोरकर, चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना पाठवण्यात आली …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here