Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 24 तासात 178 बाधितांची संख्या व...

खळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 24 तासात 178 बाधितांची संख्या व दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत,

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे ३ सप्टेंबर पासून कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2074 तर 873 बाधिता वर उपचार सुरू 1176 बाधित झाले बरे. 

चंद्रपूर कोरोना अपडेट :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ३ सप्टेंबर पासून जिल्ह्यात कडक लॉक डाऊन करण्याचे संकेत दिले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1176 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 873 बाधितांवर उपचार सुरू आहे. 24 तासात 178 बाधितांची नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, नेताजी चौक विजासन रोड, भद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला 19 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने 28 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.

तर दुसऱ्या बाधिताचा आज 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता 49 वर्षीय शेडमाके चौक दुर्गापूर, चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 29 जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता.

गेल्या 24 तासांमध्ये पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 76 बाधित ठरले आहेत. त्याचबरोबर, पोंभुर्णा 4, कोरपना 5, सिंदेवाही 2, वरोरा 8, ब्रह्मपुरी 4, राजुरा 10, मुल 16, गोंडपिपरी 5, सावली 33, भद्रावती 4, चिमूर 2, बल्लारपूर 8, नागभिड एक असे एकूण 178 बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर शहरातील नगीना बाग, पंचशील चौक, जटपुरा वार्ड, जलनगर, भानापेठ, तुकूम, रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, बियाणी नगर, चांदमारी चौक, पठाणपुरा गेट, गंज वार्ड, रामनगर, गोपाल पुरी वार्ड, सरकार नगर, रयतवारी, सिव्हिल लाईन, जीएमसी चंद्रपूर परिसर, नर्सिंग होस्टेल परिसर, गायत्री नगर, बालाजी वार्ड, सन्मित्र नगर, कृष्णा नगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, समाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुस, मोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.

पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाही, गडचांदूर, आवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

सिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगर, अभ्यंकर वार्ड तर तालुक्यातील शेगाव, अहेगाव गावातून पॉझिटिव पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरी, चांदली गावातून बाधीत ठरले आहेत.

राजुरा येथील पेठ वार्ड, इंदिरानगर, साई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूर, विहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा, बोरचांदली, राजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, वढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु, सामदा गावातून बाधित पुढे आले आहेत.भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here