Home नागपूर गंभीर :- सामाजिक माध्यमांमधे अश्लिल दृष्यांवर त्वरित बंदी करा, मनसे महिला...

गंभीर :- सामाजिक माध्यमांमधे अश्लिल दृष्यांवर त्वरित बंदी करा, मनसे महिला सेनेची मागणी.

 

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने कडून मोबाईल वरील व्हाॕट्स अप, फेसबुक लाइव्ह विडिओज, इंटरनेट वरिल आक्षेपाह्य विडियोज तथा नेटफ्लिक्स वरील वेबसिरिज, चित्रपटातिल अश्ल्लिल दृष्यांवर बंदी संदर्भात केंद्रीय दूरसंचार मंत्री यांना निवेदन.

नागपूर मनसे वार्ता :-

सध्या इंटरनेटच्या माध्यमातून जनमानसात सहजतेने मोबाईल व कम्प्युटर मधील फेसबूक व व्हाट्सअप गृप तथा विविध वेब साईड च्या व्दारे प्रसारित होत असलेल्या आक्षेपाह्य पाॕर्न विडिओजकडे सगळ्यांचे लक्ष वेधल्या जात आहे. आजकाल मोबाईल किंवा कम्प्युटर सहजतेने लहान मुलांपासून तर वयस्क व्यक्ती हाताळत असून आज ते जिवनावश्यक वस्तूंच्या रूपात सगळ्यांना आवश्यक झाले आहे परंतु आजच्या परिस्थितीत व्हाॕट्सअप तथा फेसबूकवर नव्याने उपलब्ध झालेल्या सुधारित ॲप मधील विडिओ तथा लाईव्ह विडिओच्या माध्यमातून अश्लिल व बिभस्य सिनेमातील क्षणचित्र किंवा लाईव्ह विडिओज शेअर केलेली आढळून येत आहे. मधल्या कालावधीत ” बाॕईज लाॕकर रूम” नावाच्या वेब साईडवर देश विदेशातिल अनेक कमी वयाच्या मुलींचे आक्षेपाह्य विडिओज प्रसारित करण्यात आलेली होती. या सारख्या अनेक साईड आज उपलब्ध व कार्यान्वित आहे. ज्याची माहिती सर्वसामान्य “टिनयेजर” मुला-मुलींना राहत असून सरकारच्या कार्यक्षेत्रात असलेल्या “दुरसंचार मंत्रालय व सायबर सेल किंवा सेंन्सार बोर्ड यांना माहीत नसणे म्हणजे विचारात पाडणारी बाब आहे? सध्या संपुर्ण देशासह व महाराष्ट्र राज्यात “करोना माहामारी” व “लाॕकडाऊन” परिस्थिती मुळे बहुतांशी शाळा व महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था “आॕनलाईन” शिक्षणावर भर देत आहे. ज्याला केंद्रीय व राज्य शासनाकडूनच प्रोत्साहन दिल्या जात आहे. परंतु हे करित असतांना पालकांकडून कमी वयोगटातील किशोर वर्गीय विद्यार्थ्यांच्या हातात आॕनलाईन शिकवणी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी “मोबाईल” व “कम्प्युटर” दिल्या जात आहे. ज्यात सर्वसाधारणपणे व्हाॕट्स अप, फेसबुक व यु-ट्युब सारखे माध्यम अपलोड केलेली असतात. अशा माध्यमातून येणाऱ्या अश्लिल व बिबस्य विडिओज व इतर गोष्टींकडे किशोरवयीन तसेच युवावर्ग आकर्षित होण्याची संभावना अधिक आहे. देशाच्या उभारणीत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या युवा पिढिचे भवितव्य व देशासह राज्यात वाढते बलात्कार व बाल अत्याचार रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने केंद्रीय दुरसंचार मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली. केंद्रीय सायबर सेल तथा राज्य सायबर सेल, मुंबई.केंद्रीय तथा राज्य सेंन्सार बोर्ड, मुंबई.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.गृहमंत्री,महाराष्ट्र शासन इत्यादींना निवेदन देऊन “व्हाॕट्स अप तथा फेसबुक विडिओज अॕप” तथा “इंटरनेट वरील अश्शिल वेबसाईड, प्रोनोग्राफी साईड” तसेच “नेटफ्लिक्स” सारख्या खुल्या मनोरंजन साईडवर प्रसारित होणाऱ्या A ग्रेड मुव्ही अथवा सिरियल्स मधील आक्षेपार्ह दृष्यांवर अथवा विडिओज इत्यादिवर तात्काळ बंदी किंवा सदर विडिओज प्रसारित करण्यावर बंदी लावण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे महिला सेनेच्या नागपूर शहर अध्यक्षा कल्पना चौहान यांनी निवेदनातून दिला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने रिटाताई गुप्ता अध्यक्षा- महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शालिनी ठाकरे अध्यक्षा- चित्रपट सेना यांना सुद्धा निवेदन पाठवून सदर गंभीर प्रकरणी मुंबई स्तरांवर पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here