लग्न होऊन आलेल्या मयुरीची महिण्याभरातच हुंड्यासाठी सासर कडंच्याकडून बेदम मारहान करून हत्त्या?
नागपूर:-
१६ मे रोजी पुण्यातील बावधन परिसरात वैष्णवी हगवणे(२६) हिने सासरच्याकडून हुंड्याची मागणी व त्यासाठी सतत मारहान व मानसिक त्रास यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचाचे लक्ष वेधले गेले होते आणि प्रसामाध्यमात हगवने कुटुंबाविषयी प्रचंड संताप व्यक्त होतं होता, त्यामुळे पोलिसांनी हगवणे कुटुंबातील मुलगा सासरे दीर यांना अटक करून त्यांना पोलीस कोठाडीत ठेवले. ही घटना ताजी असतांना विदर्भातील नागपूर जिल्ह्यात पुन्हा अशीच एक नवविवाहिता मयुरी डाहुले ही हुंडाबळीची शिकार झाली असून अगदी महिनाभरातच पती व सासर कडील लोकांच्या दररोज च्या हुंड्यासाठी शिवीगाळ व मारहानी ने असह्य वेदना सहन करणाऱ्या मयुरीचा काल 31 मे ला रात्री जबर मारहान केल्याने तीचा आकास्मिक मृत्यू झाला, मात्र ही मयुरीची एक प्रकारे हुंड्यासाठी हत्त्या च असल्याने दोषींना बटीबोरी पोलिसांनी पती दीर व सासऱ्याला अटक केली आहें.
ठाकरे कुटुंबातील मयुरी हिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील सोनेगावच्या अभिषेक डाहुले यांच्याशी दिनांक 25/4/2025 ला भाग्यश्री मंगल कार्यालय सोनेगाव येथे हिंदू रितिरिवाजने अतिशय थाटात करण्यात आला, मुलीला अंदाजे 2.5 लाखाचा अहिर तर अंगावर पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि लग्न थाटात झाले मात्र अगदी आठ दिवसातच पती अभिषेक सासरे दिपक आणि दीर हे तुझ्या वडिलांकडून 5 लाख आन यासाठी मयुरी कडे तगादा लावत होते, दरम्यान दिनांक 28 मे 2025 ला मयुरीला मारहान करण्यात आली तेंव्हा तिने सहन केले मात्र दिनांक 30 तारखेला पुन्हा मारहान केल्यानंतर -31 मे ला तीला एवढे अमानुषपणे मारहान केली की तीचा जागीच मृत्यू झाला, दरम्यान मुलीकडील आई वडील यांना कुठलीही सूचना न देता परस्पर हे प्रकरण दडपण्याचा डाहुले परिवाराचा डाव होता, मात्र गावातील एका व्यक्तीने मुलीचे मुंबई येथील नातेवाईक सुधीर खापणे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली की मयुरी ला तिच्या सासरच्यांनी ठार केले, तेंव्हा चक्र फिरली व मयुरी च्या हत्त्याची घटना समोर आली.
प्रेम प्रकरणातून लग्न,आणि शेवटी अंत.
मुलगी मयुरी ही अत्यंत हुशार होती व नर्सिंग पास झाली होती, तीला नोकरी लागण्याची शास्वती होती मात्र तीचे प्रेम अभिषेक शी जुळले आणि लग्नापर्यंत गोष्ट गेली, मयूरी च्या घरच्यांनी तीला समाजावले की तुला चांगले स्थळ येईल तू आत्ताच निर्णय घेऊ नको पण प्रेमात हट्ट पकडलेल्या मयुरीला तिच्या मनासारख्या अभिषेक डाहुले शी घरच्यांनी अगदी थाटात विवाह करून दिला,पण दुर्भाग्य नशिबात काही वेगळंच लिहिलं असावं त्यात मयुरीचं प्रेम अंगलट आलं आणि सुखी संसाराच स्वप्न भंगल, म्हणून प्रेमात लग्न यशस्वी होईल हे खरं ठरेलंच याची शास्वती नाही.