अविरत 24 वर्ष शिक्षक म्हणून कार्य करून शेकडो विद्यार्थ्यांना घडविण्यात शिवरकर यांची कारकीर्द प्रसंशनीय.
व्यक्तीविशेष :-
“रख हौसला बुलंद वो मंजर भी आयेगा,
प्यासे के पास चल के समन्दर भी आयेगा,
थक कर न बैठ ऐ मंज़िल के मुसाफिर,
मंज़िल भी मिलेगी और मिलने का मज़ा भी आयेगा।”
वरील पंक्तीतून ज्या पद्धतीची ऊर्जा मिळते ती ऊर्जा घेऊन माध्यमिक शिक्षणानंतर पदवीचं शिक्षण घेत शिक्षक बनायचं हे ध्येय बाळगणारे, शिक्षक बनण्यासाठी डोनेशन कुठून आणायचं या विवंचनेत असताना सुद्धा आपण यशस्वी होईलचं ही उर्मी ठेवणारे शिक्षक राजेश शिवरकर खरोखरच युवकांचे प्रेरणास्रोत ठरले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच पण त्या संघर्षात ज्यांनी आपले ध्येय निश्चित केले त्यांनी त्यांचे ध्येय गाठले आणि यशस्वी झाले हा इतिहास आहे आणि हा इतिहास घडविणारे राजेश शिवरकर यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे, कारण अगदी विपरीत परिस्थितीत त्यांनी आपले ध्येय निश्चित करून एक यशस्वीपणे आपली 24 वर्षाची शिक्षकी सेवा केली आणि कित्तेक विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाची भरारी घेणारी ऊर्जा दिली त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांचे प्रेरणास्रोत आहे हे विशेष.
यवतमाळ जिल्ह्यातील कुंभा येथे भारत विद्या मंदिर मध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना काही विद्यार्थी अर्ध्यातून शाळा सोडून गेले तर काही मॅट्रिक पर्यंत शिकले पण शिक्षक म्हणून नौकरी मिळविणारे राजेश शिवरकर हे सन 1989 च्या मॅट्रिक बैच मधील पहिले विद्यार्थी ठरले, राजेश शिवरकर यांनी आपल्या परिवारासह बहीण,भाचा भाची यांच्या साठी तर सर्वोपरी सहकार्य केलेच पण मित्र मंडळी गरजवंत यांना सुद्धा वेळीवेळी मदत देऊन आपल्या शिक्षकी पेशाला साजेशे कर्तव्य त्यांनी बजावले, कुठलिही वाईट सवय नाही की व्यसन नाही फक्त जीवनात दुसऱ्यांना आनंद देणारे राजेश शिवरकर यांनी आदर्श शिक्षक म्हणून जवळपास 24 वर्ष लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेला येथे शिक्षण सेवा दिली व कित्तेक विद्यार्थी घडवले, आज त्यांचा 50 वा वाढदिवस आहे म्हणजे त्यांच्या वयाचा सुवर्ण महोत्सव आहे. या निमित्याने त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो व त्यांच्या कडून समाजाची सेवा अशीच घडत राहो हीच प्रार्थना.