वयाच्या 74 व्या वर्षी सुद्धा त्यांची व्यस्त दैनंदिनी बघून तरुणांना मिळताहेत प्रेरणा.
वरोरा प्रतिनिधी :-
खरा शिक्षकच समाजाला योग्य दिशा दाखवतो…” या महान विचाराने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या भारत देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी समर्पित केले. आयुष्यातील जवळपास 40 वर्षे शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक मुलांना शिकवले अगदी त्याच धर्तीवर जनार्दन गोपाळराव देठे गुरुजी रा. बेलगाव (खदान ) यांनी जणू त्यांचा वसा घेत शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य करून त्यांनी जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विद्यार्थी घडवले आहे, माढेळी येथील किसान विद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने घडवले की आज ते मोठमोठ्या हुद्द्यावर आहे, विशेष म्हणजे व्होलीबॉल या क्रीडा क्षेत्रात त्यांनी देशापातळीवर विदयार्थी घडवले आहे. आज ते पंढरपूर येथील गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे एका खेडयात राहणाऱ्या व्यक्तीने एवढी उंची गाठावी हे खरोखर प्रेरणादायी आहे. आज त्यांचा वाढदिवस असून वयाच्या 74 व्या वर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून नवयुवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरु आहे त्यामुळे देठे गुरुजी म्हणजे चालते फिरते व्यासपीठ बनले आहे.
जनार्दन गोपाळराव देठे गुरुजी यांची
आज वयाची 74 वर्षे पूर्ण झालीत. पण आजही त्यांचा उत्साह अगदी तरुणांना लाजवेल असाच आहे तर त्यांची कार्यतत्परता सामाजिक मनाला वेड लावणारी आहे. त्यांची दिनचर्या तरुणांना प्रेरणा देणारी असून पहाटे 4.30 ला उठून स्नान आदी आटोपून आराध्य श्री गुरुदेव ” यांची ध्यान प्रार्थना ते करतात व सकाळी एक तास पायी फेर फटका मारतात. त्यांच्या या दैनंदिनीने आजही ते निरोगी आहेत व सामाजिक कार्य त्यांचे अविरत सुरु आहे. सेवानिवृत्त होऊन जवळपास 14 वर्ष झाली पण समाजातील लोक गुरुजींना एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श ” गुरुजी ” असे सबोधतात, गुरुजींचा अबाल वृद्ध थोरामोठ्या सोबत व समाजातील तळागाळातील लोकांसोबत जिव्हाळ्याचा संबंध आहे, त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. म्हणूनच गुरुजींची लोकप्रियता उतररोत्तर दिवसगणिक वाढतच चालली आहे. खरं तर शासनाने त्यांना आदर्श शिक्षकांचा पुरस्कार दिला नसला तरी त्यांचे सेवाभावाचे कार्य अजूनही “आदर्श शिक्षका प्रमाणे सुरूच आहे.”देठे गुरुजी ” हे एक नाव नाही तर ति एक अलौकिक शक्ती आहे कि जिच्या प्रेरणेने लोक आजही सुखवताय अशा अलौकिक व्यक्तिमत्व असलेल्या देठे गुरुजींना परमेश्वर दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.