Home गडचिरोली खळबळजनक :- वनविभागाचे सोनटक्के भ्रष्टाचाराच्या पूर्णतः गोत्यात, तरीही तपास अधिकारी मात्र संरक्षणात?

खळबळजनक :- वनविभागाचे सोनटक्के भ्रष्टाचाराच्या पूर्णतः गोत्यात, तरीही तपास अधिकारी मात्र संरक्षणात?

 

कुरखेडा चे भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांना वाचविण्याचा वन विभागाचा प्रयत्न !
मुख्य वनसंरक्षक आत पर्यंत अद्याप अहवाल पोचलाच नाही! झालेल्या भ्रष्टाचाराची रिकव्हरी घेऊन “जंगल” विकण्यासाठी सोनटक्के यांना मोकळे सोडण्याच्या प्रयत्न.

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर व तपासामध्ये ते निष्पन्न झाल्यानंतर आता त्यांच्यावर रिकव्हरी काढून त्यांना पुन्हा “जंगल” विकण्यास रान मोकळे करून देण्यासाठी वनविभागाचे काही अधिकारी कामाला लागले असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. कुरखेडा वनपरिक्षेत्रातील सर्वच कामात भ्रष्टाचार केलेल्या सोनटक्के यांनी आपल्या पैशाच्या बळावर संपूर्ण वनविभागाच विकत घ्यायला निघाले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीत ते दोषी आढळले असून त्यांच्यावर 17 लाखाची रिकव्हरी काढून त्यांना अभय देण्याचा प्रयत्न वन विभागांमध्ये सुरू आहे, तपास अधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक यांना सोनटक्के यांचा तपासाचा अहवाल सादर केलेला नसून मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे मुख्य वनसंरक्षक यांची मीटिंग सुरू आहे. या मिटींगमध्ये तपास अधिकारी लेनदेन च्या माध्यमातून सोनटक्के यांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की कुरखेडा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे विविध वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी झाल्यानंतर सोनटक्के यांची विभागीय चौकशी सुरू झाली होती. या विभागीय चौकशीत तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याच्या अनेकदा सोनटक्के यांच्याकडून प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र या विभागीय चौकशीत सोनटक्के दोषी आढळले असून त्यांच्यावर वन विभाग कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. साप्ताहिक भूमिपुत्रांची हात या न्यूज पोर्टलने यापूर्वी त्यांचे अनेक प्रकरण उघडकीस आणले. आपला राजकीय दबाव व भ्रष्टाचारातून कमाविलेली माया याच्या भरोशावर सोनटक्के यांनी तपासादरम्यान तपास अधिकारी वृत्तपत्राचे प्रतिनिधी यांना दबावात आणण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर त्यांच्या भ्रष्टाचाराचे पालते उताने पडत असतानाच फक्त रिकवरी घेऊन मोकळे सोडण्यात यावे अशी चाल सोनटक्के खेळत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपास अधिकारी दिशाभूल करीत असल्याचे सांगितले जात आहे. भ्रष्टाचारात लिप्त असलेले सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास महाराष्ट्र मध्ये सगळ्यात मोठा वन विभागातील भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर व मंत्रालय स्तरावर तक्रारी करण्यात आल्या असून सोनटक्के यांचेवर कारवाई करण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्यामध्ये हे मनसे स्टाईल आंदोलन उभारेल असे मुख्य वनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. सोबतच सोनटक्के यांना निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने द्वारे करण्यात आली आहे.

Previous articleबेधुंद मद्यपी दारूड्या युवकांकडून वाहतुक पोलिसाला मारहाण प्रकरणात चार आरोपींना अटकाव
Next articleधक्कादायक :- आता महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीचे भानापेठ येथील साई सुमन अपार्टमेंट सुद्धा बेकायदेशीर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here