Home चंद्रपूर धक्कादायक :- कंस मामा गोरख गुप्तांचा सैतानी खेळ सुरूच, भाच्याला 36 लाखांनी...

धक्कादायक :- कंस मामा गोरख गुप्तांचा सैतानी खेळ सुरूच, भाच्याला 36 लाखांनी गंडवल्या नंतरही मुजोरी कायम?

 

घूग्गूस पोलीस महेश मांढरे हाच गोरख गुप्ताचा पाठीराखा?

घूग्गूस न्यूज नेटवर्क.

पोलिसांच्या सानिध्यात किती लोकांनी आपली दहशत चालवली असेल याचा अंदाज येत नसला तरी द्वापर युगातील कंस मामाला लाजवेल अशा क्रूर पद्धतीने आपल्या सख्ख्या भाचाला जवळपास 36 लाखानी गंडविणाऱ्या गोरख गूप्ताला मदत करणारा व त्याचा पाठीराखा घूघूस पोलीस शिपाई महेश मांढरे ह्याच्यामुळे गोरख गुप्ताची हिंमत वाढली असून भाचा संजय गूप्ताला खुलेआम आव्हान करून पैसे मी देणार नाही तुला जे करायच ते कर असा दम भरल्या जात आहे.

घूग्गूस पोलीस महेश मांढरे ह्याची संपादकाला धमकी?

खरं तर घूग्गूस पोलीस महेश मांढरे हा किती बुद्धिमान आहे आणि त्याचे कुठे कुठे काय काय सुरू आहे याची माहिती येणाऱ्या काही दिवसात उघड होईलच. पण जेंव्हा दिनांक 18 मार्चला भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर बातमी प्रकाशित झाली त्यावेळी त्या पोलीसांनी चक्क संपादकांना घूग्गूस पोलीस स्टेशन मधे बोलवल होत. त्यावर संपादकांनी त्याला मी काय आरोपी आहे का तुझ्या सांगण्यावरून पोलीस स्टेशन मधे यायला? असा सवाल केल्यानंतर त्यांनी नरमाई घेतली.

गोरख गूप्ताच्या मुलाला पण चढला माज?

आपले पोलीस स्टेशन मधे सेट्टिंग आहे तो संजय गुप्ता काय करणार? एका पेपर मधे बातमी दिली तर काय फरक पडते आम्ही संजय गूप्ताला यू गायब करू शकतो अशा वल्गना करणाऱ्या कंस मामा चा मुलगा आता सार्वजनिक ठिकाणी बोलत असल्याने पोलीस महेश मांढरे जो ह्या कंस मामा गोरख गूप्ताच्या घरी किरायाने राहतो त्याच्यामुळे मामा व त्यच्या मुलाला कसा माज आला आहे हे स्पष्ट होते. बिचाऱ्या संजय गुप्ता ह्याचे मामाला दिलेले व हीशोबाचे असे मिळून 36 लाख संदर्भातील पुरावे तक्रारी सह पोलीस स्टेशन मधे दिले पण आता कंस मामा गोरख गुप्ता डुप्लिकेट पुरावे सादर करून स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

गोरख गुप्ताकडे एवढी संपती कशी?

बहिणीच्या मायेच्या खातिर स्वतःच्या नावे ट्रक घेवून व बहिणीचे पैसे बुडवून आपल्या प्रांतात व घूग्गूस मधे एवढी संपती जमविणार्या मामा कंस गोरख गुप्ता आता जर इन्कम टैक्स विभागाची धाड पडली तर ही संपती दाखविणार कुठून ?अशी चर्चा सुरू आहे.आणि स्वतःच्या भाच्याला जो व्यक्ती बुडवतो त्याने कित्तेकांना बुडवले असतील त्याची यादी सुद्धा मोठी असल्याची चर्चा आहे.मात्र पोलीस शिपाई महेश मांढरे यांच्या सहकार्याने कंस मामा गोरख गुप्ता आता किती काळ स्वतःला वाचविणाऱ हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here