Home वरोरा सनसनीखेज :-डायनासोर चे अवशेष सापडलेल्या परिसरात लागली भयंकर आग.

सनसनीखेज :-डायनासोर चे अवशेष सापडलेल्या परिसरात लागली भयंकर आग.

 

वन विभाग व पोलीस प्रशासन कर्मचारी पोहचले घटनास्थळी.

तालुका प्रतिनिधी (किशोर डुकरे)

आशिया खंडात प्रथमच भारतातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदूरा (तालुका वरोरा) या गावाच्या शिवारात हजारो वर्षापूर्वीचे डायनासोर चे अवशेष सापडले होते त्या परिसराला लागून असलेल्या परिसरात काल रात्री जवळपास ७.३० च्या दरम्यान भयंकर आग लागली आणि दहा किलोमीटर पासून ह्या आगीच्या ज्वाला दिसायला लागल्या होत्या या संदर्भात जागरूक नागरिकांनी वन विभागाचे उराडे व शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार बोरकुटे यांना माहिती दिली आणि तत्काळ ही आग विझवा अन्यथा डायनासोर च्या अवशेष असलेला परिसर जळून खाक होईल असा इशारा दिला त्यामुळे वन विभाग व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहचलेल्या वन विभाग व पोलीस कर्मचारी यांनी हा परिसर बघितला व त्यांनी माहिती दिली की ही आग महसूल विभागाच्या जागेवर आहे आणि हा परिसर डायनासोर च्या अवशेष सापडलेल्या परिसराला लागून आहे. ह्या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी आगीचे कारण अजून कळले नाही.

 

Previous articleधक्कादायक :- कंस मामा गोरख गुप्तांचा सैतानी खेळ सुरूच, भाच्याला 36 लाखांनी गंडवल्या नंतरही मुजोरी कायम?
Next articleशैक्षणिक वार्ता :-30 एप्रिल पर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद, ऑनलाइन वर्ग सुरू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here