Home चंद्रपूर स्तुत्य कार्य :- मनसैनिकांच्या पाठबळामुळे अंजली खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.

स्तुत्य कार्य :- मनसैनिकांच्या पाठबळामुळे अंजली खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.

 

जिथे विषय गंभीर तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर!

क्रीडा वार्ता  :-

बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील अंजली अनिल चलकलवार हिची इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टेनिस बाल क्रिकेट चॅम्पीयनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र तिची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने तिला प्रवासासाठी व इतर खर्चासाठी आर्थिक अडचण भासत होती. याबाबत माहिती होताच तिला चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात बोलावून मनसे तर्फे तिचा सत्कार करण्यात आला आणि तिला प्रवास व इतर खर्चासाठी आवश्यक निधी मनसे पदाधिकार्यांनी एकत्र गोळा करून दिला, त्यामुळे तिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

अंजली अनिल चलकलवार हिची इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टेनिस बाल क्रिकेट चॅम्पीयनशिपसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी तिचा सत्कार केला पण जेंव्हा तिला आर्थिक मदत करायची वेळ आली तेव्हां मात्र सर्वानी आपले हात झटकले पण जिथे विषय गंभीर असतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर असते अगदी हीच भूमिका चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी पार पाडून तिच्या सोनेरी भविष्यासाठी आर्थिक मदत करून एक प्रकारे सामाजिक दायित्व जोपासले आहे.

२० ते २३ मार्च दरम्यान कन्याकुमारी येथे पार पडलेल्या टेनिस बाल क्रिकेट राष्ट्रीय स्तरावरील महिला गटात अंजलीची निवड झाली होती. यावेळी तिने दाखवलेल्या कौशल्याने तिची इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टेनिस बाल क्रिकेट चॅम्पीयनशिपमध्ये भारतीय संघात स्थान मिळविले आहे. ही स्पर्धा नेपाळ येथील पोखरा येथे होणार आहे. तिच्या या सार्थ परिश्रमांला अधिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला मदत करून एक प्रकारे तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, किशोर मडगुलवार, पियुष धुपे,मनोज तांबेकर, महेश शास्त्रकार,विवेक धोटे,कुलदीप चांदनखेडे, प्रकाश नागरकर,करण नायर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here