Home महाराष्ट्र विलक्षण सत्य :- सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोनामुक्त होईलं ?

विलक्षण सत्य :- सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोनामुक्त होईलं ?

 

लक्षवेधी:-

खरं तर भारतात कोरोना हा संक्रमित करणारा रोग केंद्र आणि राज्य शासनाने आणलेले संकट आहे असेच एकूण आजवर घडलेल्या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. कारण जर विदेशातून कोरोना आला तर केंद्र शासनाने विमानतळावर विदेशी प्रवाशी यांना कॉरॉनटाइन का केले नाही? आणि जर त्यांना कॉरॉनटाइन केले असते तर देशात कोरोना पसरला असता का? राज्य शासनाने जर आपल्या प्रदेशातील लोकांना सजग करून व बाहेरील प्रांतातून आलेल्या लोकांना कॉरॉनटाइन केले असते तर राज्यात पण कोरोना पसरला असता का? याचा अर्थ ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन मधे आज मरणयातना भोगाव्या लागत आहे त्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भोगाव्या लागत आहे.आणि सरकार लॉक डाऊन कडक करून सर्वसामान्य जनतेला पुन्हा वेठीस धरत आहे पण ही वस्तुस्थिती कुणी समजून घ्यायला कुणी तयार पण नाही.

कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर लसीकरण व औषधोपचार सोबतच समाज जाग्रुती करणे आवश्यक आहे.
पण महाराष्ट्र राज्याची परिस्थिती बघितली तर लसं पुण्यात तयार होते आणि महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे.
१२ कोटी लसी ३ दिवसात सिरम तयार करते शिवाय महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही मग हीच निवडणूकीतील यंत्रणा जर कामावर लावली तर तीन दिवसात लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयार होते. आता प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा तर प्रत्त्येक गावात आशा वर्कर्स आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक – तलाठी – ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे. शिवाय सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचण्यासाठी स्वखुशीने सरकारच्या मदतीला येतील सोबतच लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही.

आता जर सरकारला वाटत असेल की सरकारकडे पैसा नाही तर आपले ४८+ खासदार २८८+ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होऊ शकते.पण जणू सरकारला लॉक डाऊन च्या नावाखाली राजकारण करायचे आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो जर खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे तर अगोदर सरकारने ठरवावं आणि जर या पद्धतीने ठरवल तर अवघ्या ४ दिवसात दिवसरात्र लसीकरण मोहीम राबवून कोरोना संक्रमण आटोक्यात आणू शकतो.पण करणार कोण हा मोठा प्रश्न असून आपल्या देशातील ५४५ खासदार. २४५ राज्य सभा खासदार, ४१२० देशातील आमदार. यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी कोरोना च्या लसी करिता वापरले ना? २,४५५,०००,०००,लाख म्हणजे २अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील शिवाय यात आजी – माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल.

जे आमदार खासदार निवडणूकीत करोडो लाखो खर्च करतात मग अशा विधायक कार्यात ते सामील का होणार नाही? निश्चित ते तयार होऊ शकतात व सुदैवाने कोरोना लस ही महाराष्ट्र राज्यात बनते त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा असेल तर अगदी ४ दिवसात होऊ शकतो हे वरील विवेचनातून स्पष्ट होते.

Previous articleखळबळजनक :- ग्रा पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध पो. स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.
Next articleस्तुत्य कार्य :- मनसैनिकांच्या पाठबळामुळे अंजली खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here