Home ब्रम्हपुरी खळबळजनक :- ग्रा पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्या...

खळबळजनक :- ग्रा पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध पो. स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.

 

कार्यवाहीस दिरंगाई आणि दोषींची पाठराखण केल्याचे तक्रार कर्त्यांचे आरोप.

ब्रम्हपुरी :- (क्रिष्णा वैद्य )

यंग इंजिनियरिंग एज्युकेशन सोसायटी कुरखेडा अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी फार्म,बी फार्म कॉलेज बेटाळा येथील संस्थेवर “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणाबाबत निवेदन कर्त्यांच्या दाखल तक्रारीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी कायदेशीर कार्यवाही करण्यास दिरंगाई व दोषीची पाठराखण केल्याचा आरोप करून तक्रार कर्त्यांनी थेट गटविकास अधिकारी पं. स. ब्रम्हपुरी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी मध्ये तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे

ग्रामपंचायत बेटाळा च्या नावाने सदर संस्थेने पुनः मान्यतेसाठी वापरात आणलेला 28जानेवारी 2017 मधील भोगवटा प्रमाणपत्र हा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” आहे. आणि सरपंच पदातील व्यक्तीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. असे तक्रार कर्त्यांना गट विकास अधिकारी यांनी 20-02-2020 च्या पत्रान्वये स्वतः माहिती दिली असतांना सदर “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” तयार करून देणारा आणि स्वहितासाठी वापर करून घेणारा,त्यांच्यावर कुठलीही ठोस कार्यवाही गटविकास अधिकारी यांनी केलेली नाही. 31-08-2020 ला तक्रारी संबंधित निवेदन देऊन, सात महिने(200 दिवस)पेक्षा जास्त कालावधी पूर्ण होऊन सुद्धा गटविकास अधिकारी यांनी संबंधित दोषीवर कार्यवाहीस दिरंगाई करणे म्हणजे गुन्हेगाराची पाठराखण करणे आहे आणी ही बाब संघटित गुन्हेगारी स्वरूपात येत असल्याने गटविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे अशा आशयाची तक्रार श्री रघुवीर सो. बावनकुळे आणि देवानंद रामचंद्र पिलारे यांनी पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी येथे केलेली आहे.

Previous articleधक्कादायक :- फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने राफेल घोटाळा केला उघड.
Next articleविलक्षण सत्य :- सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोनामुक्त होईलं ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here