Home राष्ट्रीय धक्कादायक :- फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने राफेल घोटाळा केला उघड.

धक्कादायक :- फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने राफेल घोटाळा केला उघड.

  1.  

    डसॉल्ट कंपनीच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर एक दशलक्ष युरो एवढी रक्कम मध्यस्थाला दिल्याचे जाहीर.

    भ्रष्टाचाराचा पंचनामा :–

    देशात मोदी सरकारने राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा केल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे काम केले होते. आता मात्र राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असल्याने मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार जगासमोर आला आहे त्यामुळे चौकीदार ही चोर है हे वाक्य सामाजिक माध्यमावर प्रचलित झाले होते त्याला एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.

    भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. ही बाब फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भाजप व केंद्र शासनातर्फे ज्या पद्धतीने राफेल घोटाळा लपविण्याचा प्रयत्न सुरू होता त्याला चपराक बसली असून भाजप आणि मोदी सरकारचा असली भ्रष्टाचारी चेहरा जगासमोर आला आहे आता प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्ष या राफेलच्या भ्रष्टाचार मुद्द्याला कसे जनतेपर्यंत पोहचवून भाजप च्या भ्रष्टाचाराची पोल खोलून त्यांचे जाहीर धिंडवडे काढणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर चपराक मधील लिहिलेल्या लेखांवर महाराष्ट्र सैनिक संतप्त.
Next articleखळबळजनक :- ग्रा पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध पो. स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here