Home ब्रम्हपुरी राजकीय कट्टा :- राज्याचं नेतृत्व करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना ब्रम्हपुरी मतदारसंघात हरवणं सोपं...

राजकीय कट्टा :- राज्याचं नेतृत्व करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना ब्रम्हपुरी मतदारसंघात हरवणं सोपं नाही.

विरोधकांना आव्हान करून जिंकणारे वडेट्टीवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठरणार बाजीगर?

राजकीय कट्टा :-

नुकतेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच राज्यात बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करत आहे, अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागुन असलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना स्वतःच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांनी आव्हान केले होते की या विधानसभा क्षेत्रात कुणबी उमेदवार यांना निवडून द्या, मात्र ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विकास कामात जी अभिनय क्रांती त्यांनी निर्माण केली आणि अनेक प्रोजेक्ट कार्यान्वित करून विरोधकांचा आवाज बंद केला त्यामुळे कांग्रेस नेते तथा  महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील प्रमुख चेहरा असणारे विजय वडेट्टीवार यांना हरवणे पाहिजे तेवढे सोपे नसल्याचे राजकीय चित्र आहे. खरं तर ज्यांनी स्वतःच्या हिंमतीवर आपलं राजकीय क्षितिज काबीज केलं ते दुसऱ्यांच्या श्रापाने कधीही डळमळीत होणार नाही ही वस्तुस्थिती आहे, महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात ज्यांच्या डोक्यावर विजय वडेट्टीवार यांचा ज्या उमेदवारांच्या डोक्यावर हात असतो तो उमेदवार कधीही पराजित होऊ शकत नाही ही किमया साधणारा एकमेव नेता म्हणजे विजय वडेट्टीवार हे समीकरण आहे, त्यामुळे त्यांना हरविण्याचा स्वप्नातही कुणी बालिशपणा करू नये.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आक्रमक नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. वनविकास महामंडळ अध्यक्ष ते राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारतांना अनेक कठीण परिश्रम घेणाऱ्या वडेट्टीवारांनी जनतेच्या मूलभूत गरजा, क्षेत्राच्या अडचणी, क्षेत्रात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, व सामजिक गरजा लक्षात घेत सर्व धर्म, सर्व समाज यांना न्याय देऊन जनतेची मने जिंकली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यांतील करंजी ही त्यांची जन्म भूमी असली तरी वडिलांचे छत्र हरपल्या नंतर गडचिरोली येथे त्यांच्या कुटुंबाचे स्थानांतर झाले. अगदी कमी वयात लोकसेवा करण्यासाठी आदिवासी दुर्गम गडचिरोली जिल्हा पिंजून काढून अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनीं आंदोलने केली व जनतेसाठी तुरुंगवास देखील त्यांनी भोगला.

शिवसेनेचे कुठलेही संघटन नसलेल्या चिमूर सारख्या क्रांतिकारी क्षेत्रात स्वतःच्या बळावर त्यांनीं चिमूर मतदार संघ पिंजून काढत त्या विधानसभेवर विजय मिळवला. दरम्यान या विधानसभा क्षेत्रात जुन्या कांग्रेस नेत्यांना ही जागा सोडून त्यांनी ब्रम्हपुरी या नव्या विधानसभा मतदार संघात उडी घेऊन हा मतदार संघ सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतला व पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या लाटेत सुद्धा या विधानसभा क्षेत्रात त्यांनी विजयश्री खेचून आणली. यावरून प्रबळ इच्छाशक्ती आणि लोकहितासाठी आपले सर्वोच्य योगदान देणारे विजय वडेट्टीवार यांना टक्कर देणं कुणाच्या आवाक्यात नाही असे बोलल्या जात आहे.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा नायक म्हणून वडेट्टीवारांची ओळख.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना व जिथे कांग्रेस चे दिग्गज उमेदवार हरले असतांना आणि खुद्द मोदी हे ब्रम्हपुरी येथे प्रचार सभेसाठी आले असतांनाही जनतेनी पुर्ण ताकदीनिशी विजय वडेट्टीवार यांना मोठ्या फरकाने निवडून दिले, राज्याचे राजकारणं करत असतांना व पक्षाची जबाबदारी पेलत असताना या क्षेत्रातील जनतेची नाळ मात्र त्यांनी सैर होऊ दिली नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या शिस्तबद्ध नियोजनाने न्याय देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांनी कधी कसर सोडली नाही त्यामुळे त्यांच्यापासून कार्यकर्ते तुटले नाही आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या ताकतीवर त्यांचा गावागावात जनसंपर्क असल्याने त्यांना कुणी इथे चॅलेंज करू शकत नाही. अर्थात ब्रम्हपुरी येथे त्यांचा नायक म्हणून उल्लेख केल्या जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here