Home Breaking News ब्रेकिंग न्यूज: लाडकी बहिण योजनेचा निधी वितरण थांबविला…..

ब्रेकिंग न्यूज: लाडकी बहिण योजनेचा निधी वितरण थांबविला…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

ब्रेकिंग न्यूज: लाडकी बहिण योजनेचा निधी वितरण थांबविला….

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू असल्यामुळे लाडकी बहिण योजनेच्या निधी वितरणावर ठाम निर्बंध

महाराष्ट्र :- निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू असल्यामुळे लाडकी बहिण योजनेच्या निधी वितरणावर ठाम निर्बंध घातले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रति महिना दिले जात होते, जे त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आणि स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी होते.

राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आयोगाने अशी सूचना केली आहे की, आर्थिक योजना थेट मतदारांवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे या योजनेचा निधी थांबविला गेला आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

सरकारने चार दिवसांपूर्वी निधी वितरण थांबविल्याची माहिती आयोगाला दिली, त्यामुळे सत्ताधारी पक्षात असंतोषाची लाट आहे. विरोधकांनी याला राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर सत्ताधारी गट आपल्या योजनांवर ठाम राहण्याचा दावा करत आहेत.

या निर्णयावर जनतेचा प्रतिसाद काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. सत्ताधारी पक्षाची वक्रता आणि विरोधकांचे आरोप यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here