Home राष्ट्रीय धक्कादायक :- भाजप च्या खासदारांनी केली नितीन गडकरी यांच्याकडे देशाचे नेत्रूत्व देण्याची...

धक्कादायक :- भाजप च्या खासदारांनी केली नितीन गडकरी यांच्याकडे देशाचे नेत्रूत्व देण्याची मागणी?

 

कोरोना परिस्थिती हाताळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले अपयशी.

राजकीय कट्टा :-

आजघडीला देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठं थैमान घातलं आहे. रोज ३ ते ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असं असतानाच आता थेट भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यास मोदी सरकार अपयशी झाल्याने देशाचे नेत्रूत्व नितीन गडकरी यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची कोरोना परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केलीय. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. पण आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच आणखी एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here