कोरोनाचा खैरे कुटुंबावर घाला, आधी पत्नी, मग वकील कन्येचा मृत्यू, आंबेडकरी जनता दुःखात.
चंद्रपूर /अकोला प्रतिनिधी ;-
समाज क्रांती आघाडी च्या माध्यमातून लढणारे, भारतीय संविधानाचे अभ्यासक, संविधान बचावासाठी सतत धडपडणारे आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व, तळागाळ्यातल्या गोरगरीब लोकांसाठी, आदिवासी लोकांसाठी संघर्ष करून न्याय मिळवून देणारे विधिज्ञ, सामाजिक न्यायासाठी संवैधानिक चळवळीचे निर्माते प्राध्यापक मुकुंद खैरे यांचे दुःखद निधन झाले आहे, दुःखाची बाब म्हणजे आधी पत्नीचे निधन झाले होते व नंतर वकील कन्या असलेल्या ॲड. शताब्दी यांचे सुद्धा निधन झाले होते.
प्रा. मुकुंद खैरे यांच्या निधनाची वार्ता ही आंबेडकरी जनतेला फारच वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे तर त्यांचे अनुयायी निःशब्द झाले आहे. काय म्हणावं या नियतीच्या न्यायाला ? ज्या माणसाने हजारो लोकांचे अश्रू पुसले, शेकडो लोकांचे संसार उभे केले, त्यांना जगण्याचा आधार दिला तोच माणूस, जो कणखर होता तरीही तो इतका हतबल आणि निराधार व्हावा काय म्हणावं याला? मन सुन्न झाले. विचारचक्र ठप्प झालं अशा शोकमग्न प्रतिक्रिया समोर येत आहे.
समाज क्रांती आघाडीचे प्रमुख प्रा. मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. खैरेंच्या निधनामुळे आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे. दुर्दैव म्हणजे कोरोनाचा संपूर्ण खैरे कुटुंबावरच घाला घातला. त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरेआणि पत्नीचेही नुकतेच निधन झाले.अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रा. मुकुंद खैरे यांची प्राणज्योत मालवली. आंबेडकरी समुदायासाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. तीन दिवसांपूर्वी अकोल्यात उपचार सुरु असताना त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे यांचेही कोरोनाने निधन झाले होते. तर गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला.मुकुंद खैरे हे आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते. खैरेंनी 2009 मध्ये अकोल्यातील मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
.