Home कोरपणा क्राईम स्टोरी :- पिपरी च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला अटक.

क्राईम स्टोरी :- पिपरी च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला अटक.

 

महिलेच्या तक्रारीवरून कोरपना पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा केला दाखल.

*कोरपना प्रतिनिधी* :-

कोरपना येथुन जवळच असलेल्या पिपरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल उर्फ प्रफुल चांदेकर यांनी एका महिलेला नाहक त्रास देत असल्याने असाह्य झालेल्या महिलेने कोरपना पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत कोरपना पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनिल चांदेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक त्याला करण्यात आली.

पोलीस सुञाच्या माहिती नुसार अनिल उर्फ प्रफुल चांदेकर हा पिपरी येथे राहात असुन तो तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. पिपरी येथुन जवळच असलेल्या एका गावातील महिलेशी ओळख झाली. तीच्या घरी येणे जाणे सुरु झाले. कधीही रात्रीबेरात्री तिच्या घरी जाणे व तीला धमकावून अश्लील बोलुन शिवीगाळ करणे. असे काही दिवसापासुन सुरु झाले. महिला असल्याने आपलीच बदनामी होईल व आपल्या जिवीताला धोका होवु शकतो याच उद्देशाने ती गप्प होती. मात्र तक्रारी च्या एक दिवसा अगोदर तो घरी आला आणि वाईट नजरेने पाहुन अश्लील शब्द वापरुन धमकी दिली त्यामुळे घाबरून ती महिला घरा बाहेर पडुन सरळ कोरपना पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोरपना चे ठाणेदार अरुण गुरनुले यांनी अनिल चांदेकर यांच्या विरोधात 450, 354 (ड) (1),294,506,66 या कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. व अनिल याला अटक करण्यात आली.चार मे ला राजुरा न्यायालयात हजर केले व न्यायालयानी एक दिवसाचा पिसिआर दिला आज त्याची रवानगी चंद्रपुर कारागृहात करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरुण गुरनुले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here