Home वरोरा आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे

आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे

 

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कर्ज वितरण.

टेमुर्डा (वरोरा) :-

भारत देश हा खऱ्या अर्थाने गावात बसत असतो आणि गावातील शेतकरी शेतमजूर व गावातील महिला यांच्या श्रमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते त्यामुळे गाव संपन्न होईल तर देश सुद्धा संपन्न होईल हा आशावाद घेवून सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महिलांच्या बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी बैँकेकडून कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न चालवला आहेत, त्यामुळे बचत गटाच्या महिला कोरोना च्या लॉक डाऊन काळात सुद्धा आपले काम कोविड योध्दा बणून जोमाने करतील व आपआपले गाव कोरोनामुक्त ठेवतील असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी केले.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा जवळच्या केम येथील प्रगती महिला बचत गटाला दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., शाखा टेमर्डाच्या माध्यमातून संचालक रवि शिंदे यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी महिलांना रवि शिंदे यांच्या वतीने मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात शाखाधिकारी कोहिनूर भोयर, निरीक्षक दिपक चिडे, रामदास वांढरे, योगेश पचारे, पोर्णिमा वावरे, बंडू डोंगरे, प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती ढोके, सचिव प्रतिभा राऊत, सदस्य संगीता खिरटकर, प्रीती ढोके, स्वाती पावडे, शशीकला पावडे, बेबीताई राऊत, दुर्गा ढोके, अल्काताई खिरटकर, हीराबाई ढोके, सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ताभाऊ बोरकर, सुरज निब्रड, अरविंद बोडणे, कमलाकर पाकमोडे, श्रीकृष्ण आसुटकर, ईश्वर पावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here