लाखों रुपयाचे साहित्य जाळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही.
घूग्गूस प्रतिनिधी :-
आज बुधवार 8 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घुग्घुस नगर परिषदेच्या विद्युत साहित्याचे खरडे ठेवलेल्या गोदामास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहीती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एसीसी कंपनीच्या अग्निशमन दलास तात्काळ बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामधे भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या आग लागलेल्या गोदामाच्या खोलीतील सामान आपल्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढले. दरम्यान गोदामास आग लागल्याने घटनास्थळी बाजारातील दुकानदार व नागरिकांनी गर्दी केली.