Home चंद्रपूर पोलीस क्राईम :- सायबर सेलचे पोलीस प्रशांत लारोकर यांनी अडवली बेकायदा सेट्रिन्ग.

पोलीस क्राईम :- सायबर सेलचे पोलीस प्रशांत लारोकर यांनी अडवली बेकायदा सेट्रिन्ग.

 

पोलिस वर्दीचा धाक दाखवून लाखोंची सेट्रिन्ग अडकवल्याने कंत्राटदार शालिक जेणेकर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पोलीस वर्दीचा दुरुपयोग करून पोलीस कर्मचारी हे कसे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून स्वताचे हित जोपासत असते याचे उदाहरण समोर आले असून पोलीस विभागाच्या सायबर सेल ला ड्युटी करणारे प्रशांत लारोकर यांनी त्यांच्या घर बांधकाम करणाऱ्या शालिक जेणेकर नामक कंत्राटदाराचे सेट्रिन्ग अडवून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या व नाहक आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने तो कंत्राटदार आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलीस विभागाच्या सायबर सेल चंद्रपूर येथे कार्यरत प्रशांत लारोकर यांनी शालिक जेणेकर यांना 410000/-रुपयाला घर बांधकाम करण्याचे कंत्राट दिले होते, दरम्यान त्यांनी जवळपास 340000/-रुपये कंत्राटदार शालिक याला दिले पण नंतर 10-15 टक्के काम बाकी असताना तू ते काम पूर्ण कर तरच मी तुला पैसे देईन असे बोलून कंत्राटदाराचे 70000/-रुपये अडवले त्यामुळे मजुरांना पैसे द्यायचे कुठून म्हणून हतबल झालेल्या कंत्राटदारांनी काम बंद केले. पण माझ्या घराचे काम का बंद केले म्हणून पोलीस वर्दीचा दुरुपयोग करून रामनगर पोलीस स्टेशन मधे व दूर्गापूर च्या पोलीस स्टेशन मधे कंत्राटदाराला बोलावून उलट कंत्राटदारांनी माझे काम बंद पाडले म्हणून 70000/- रुपयाची मागणी लारोकर यांनी कंत्राटदाराकडे केली व जवळपास 250000/- रुपयाची सेट्रिन्ग अडवून कंत्राटदाराला मानसिक त्रास देणे सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे कंत्राटदार शालिक यांनी जी सेट्रिन्ग घर बांधकाम जागेवर आणली ती किरायाने आणली असून दररोज त्या सेट्रिन्गचे भाडे कंत्राटदाराला द्यावे लागत आहे आता ते भाडे 50000/- रुपयावर पोहचले असून सेट्रिन्गमालक हा पोलीस कर्मचारी लारोकर यांच्याकडे सेट्रिन्ग मागायला गेला असता मी तुझ्याकडून सेट्रिन्ग आणली नाही तू त्या कंत्राटदाराला माग असे म्हणून कंत्राटदार शालिक याला आर्थिक अडचणीत टाकून व मानसिक त्रास देऊन पोलीस कर्मचारी लारोकर हे कंत्राटदाराला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याने याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

खरं तर पोलीस कर्मचारी लारोकर हे स्वतःच कंत्राटदाराला पैसे देणे बाकी असताना कंत्राटदाराची लाखों रुपयाची सेट्रिन्ग अडविण्याचा अधिकार पोलीस कर्मचारी लारोकर यांना दिला कुणी? हा प्रश्न पोलीस प्रशासनाच्या “सदरक्षनाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीदाला हडताळ फासणारा असून पीडित कंत्राटदार शालिक हा आर्थिक परिस्थितीने खचला असल्याने व त्यांनी आणलेल्या किरायाच्या सेट्रिन्ग चा माल लारोकर यांच्या घरी पडून आहे त्यामुळे आतापर्यंत जवळपास 50 हजार रुपये सेट्रिन्गच्या किरायाचे झाले असल्याने कंत्राटदार यांच्यापुढे काहीही पर्याय शिल्लक नसल्याने ते आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असता हे सिव्हिल प्रकरण असल्याचे सांगून हात झटकल्याने आपल्याला आत न्याय मिळणार नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करणार हे निश्चित वाटते पण जर त्यांनी आत्महत्या केली तर लारोकर यांच्यासह पोलीस प्रशासन यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार का? की त्यातून आपली जबाबदारी ते झट्कनार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here