Home कोरपणा अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

डालमिया भारत फाउंडेशन, नारंडा व प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठाळा यांचा संयुक्त उपक्रम

प्रमोद गिरटकर कोरपना :-

दिनांक 03.09.2021 रोज शुक्रवारला डालमिया भारत फाऊंडेशन व प्राथमीक आरोग्य केंद्र, कवठाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
बिपी, कॅन्सर,शुगर तपासणी या सारख्या रोगांची तपासणी करण्यात आली. गावातील तब्बल 114 लोकांनी या शिबिरात तपासणी करून घेतली व शिबीर आयोजित केल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराची सांगता छोटेखाणी कार्यक्रम घेऊन शीबिराला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित अंतरगाव येथील सरपंचा सौ. पोडे मॅडम व उपसरपंचा सौ. पिंपळशेंडे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथील आरोग्य अधिकारी श्री. डॉ. बावणे सर , टाटा ट्रस्टचे डॉ. तुषार रामटेके, डॉ. सूरज सालोंके, दिव्या पार्शिव अंतरगाव उपकेंद्राच्या सी. एच. ओ. कु. पूजा दांडेकर, डालमिया तर्फे श्री. प्रशांत भिमनवार, डॉ. प्रशांत खिरटकर, श्री. कुंडलीकजी देवगडे व गौरव वांढरे, लक्ष्मण कुडमेथे उपस्थित होते.

Previous articleपोलीस क्राईम :- सायबर सेलचे पोलीस प्रशांत लारोकर यांनी अडवली बेकायदा सेट्रिन्ग.
Next articleमहिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here