Home वरोरा महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,

महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,

इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा व ईरावियो क्लिनिक नागपूर यांचा उपक्रम,

वरोरा प्रतिनिधी:-

शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने चार शिक्षकांना सन्मानित केले. त्याच बरोबर महिलांमध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी ” ईरावियो क्लिनिक नागपूर ” यांच्या सौजन्याने सेमिनार आयोजित करण्यात आला . यांत डॉ आशिष चवरे व डॉ निरज गेचोडे यांनी महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वतः च्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची , ताणतणाव कसा दूर करावा , मानसिक आरोग्य कसे जपावे , दैनंदिन जीवन कसे असावे व बऱ्याच संवेदनाक्षम विषयांवर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले . तसेच
#कॉस्मेटिक स्त्रीरोग.
#केस गळतीवर उपचार
#त्वचेवर उपचार
#प्लेस लेसर उपचार
यांवर अतिशय उपयुक्त माहिती दिली. या सेमिनार ला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सेमिनार चा लाभ १४० महिला व तरुणींनी घेतला.

कार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज तर आभार प्रदर्शन सौ. दिपाली माटे यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब च्या अध्यक्षा सौ. मधु जाजू , सेक्रेटरी सौ. वंदना बोढे , दिपाली माटे , स्नेहल पत्तीवार , झेनब सिद्दिकोट , माया बजाज , अपेक्षा पांपट्टीवार , प्रणाली बेदरकर. हर्षदा कोहळे , आभा सामोरे , अर्चना ठाकरे व अन्य सदस्यानी परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here