Home क्राईम स्टोरी धक्कादायक :- अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह कारमधून फेकला.

धक्कादायक :- अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह कारमधून फेकला.

 

तासन तास वाहनं गेल्यानं मृतदेहाची ओळख पटेना.पोलिसांच्या तुकड्या नातेवाईक शोधण्यासाठी रवाना.

कोईम्बतूर न्यूज नेटवर्क :-

कोण कुठे कसा आघात होऊन आपले जीवन संपवेल याचा अंदाज कधी बांधता येत नसतो अशीच एक धक्कादायक घटना तमिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये घडली असून एका अज्ञात महिलेचा अर्धनग्न स्थितीतील मृतदेह अविनाशी रोडवर एका कारमधून फेकण्यात आला.चिन्नीयापलायम इथे घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मृतदेहावरून असंख्य वाहनं गेली होती. मृतदेह छिन्नविच्छन्न अवस्थेत असल्यानं मृतदेहाची ओळख पटलेली नाही. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

या मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या शरीरावरून अनेक वाहनं गेल्यानं तिचा चेहरा ओळखू येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. रस्त्यावरून जात असलेल्या काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस चिन्नीयापलायम इथे पोहोचले. मात्र तोपर्यंत मृतदेहाची अक्षरश: चाळण झालेली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोईम्बतूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एका फुटेजमध्ये कारमधून मृतदेह रस्त्यावर फेकून देत असल्याचं दृश्य कैद झालं आहे. त्यानंतर त्या मृतदेहावरून दोन वाहनं गेली असल्याचं दिसत आहे.

ह्या महिलेच अपघात रस्ता ओलांडताना झाला असावा आणि त्यानंतर वाहनं तिच्या शरीरावरून गेली असावीत असा पोलिसांचा प्राथमिक समज होता. मात्र त्यानंतर पोलिसांना हत्येचा संशय आला. मृतदेह अर्धनग्न स्थितीत सापडल्यानं संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. महिलेचा ऑटोप्सी अहवाल आल्यानंतर हत्येचं नेमकं कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous articleमहिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य” जागृती कार्यक्रमाचे आयोजन,
Next articleपोलीस पंचनामा :- पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला रँगेहत पकडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here