Home महाराष्ट्र पोलीस पंचनामा :- पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला रँगेहत पकडले

पोलीस पंचनामा :- पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला रँगेहत पकडले

 

जामीन मिळविण्यासाठी मागितली होती आरोपीला पाच लाखांची लाच.

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाची सद्ध्या सगळीकडे कीरकीरी होत असून त्यांना मिळालेली सेवेची संधी म्हणजे त्यांना पैसे कमविण्याचा मिळालेला ते राजमार्ग समजतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशन मधे न्याय मिळणे कठीण होऊन बसले आहे. शिवाय ज्या आरोपीला पकडले त्याच्या कडून जामीन मिळविण्यासाठी सुद्धा पैसे मागितले जाते असाच एक प्रकार पुणे च्या पोलीस स्टेशन मधे घडला असून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 5 लाखाची मागणी करुन 1 लाख रुपयाची लाच खासगी व्यक्तीकडून स्विकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राहूल अशोक पाटील (वय-33) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊसाहेब खांदवे (वय-45 रा. लोहगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार (वय-22) यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. राहूल पाटील हे पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संबंधित गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो.
असे सांगून सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि खासगी व्यक्ती खांदवे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाखाची लाच मागितली. संतोष खांदवे याने तक्रारदार यांच्यासोबत तडजोड करुन 3 लाखाची मागणी केली.
त्यापैकी 1 लाख रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार केली. पथकाने पंचासमक्ष 7 आणि 8 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक राहूल पाटील यांनी लाचेची रक्कम संतोष खांदवे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि.8) सापळा रचला.
संतोष खांदवे याला सहायक पोलीस निरीक्षक पाटील याच्यासाठी 1 लाखाची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पोलीस हवालदार अंकुश माने, पोलीस शिपाई दिनेश माने, महिला पोलीस शिपाई पूजा पागिरे, चालक पोलीस शिपाई राऊत यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here