Home Breaking News ब्रेकिंग न्यूज:- गोशीखुर्द धरणाच्या नहरात एका युवकांच्या बुडून मृत्यु.

ब्रेकिंग न्यूज:- गोशीखुर्द धरणाच्या नहरात एका युवकांच्या बुडून मृत्यु.

 

७ सप्टेंबरला गायब झालेल्या प्रशांतची आत्महत्या की हत्या? हे प्रश्न गूलदस्त्यात.

सावली प्रतिनिधी :-

सावली तालुक्यातील मंगरमेंढा येथील प्रशांत दुमाजी मेश्राम वय 20 वर्ष हे दि. ७/९/२०२१ सकाळी सुमारे ११ वाजता पासुन पाथरी भानापुर ते मंगरमेंढा या मार्गावरून बेपत्ता झाल्याची माहिती सर्वत्र देण्यात आलेली होती. तसेच पाथरी पोलिसांकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे प्रशांत चा सर्वत्र शोध सुरू असतानाच आज दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी मेहा ते उसरपार तुकुम झिरो गेट जवळ जवळ जीन्स-लाल-गुलाबी शर्ट घातला असलेला मृतदेह असल्याची माहिती परीवाराला मिळताच त्यानीं घटना स्थळी धाव घेतली व तो मृतदेह प्रशांत चा असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात पाथरी पोलीस स्टेशन ला माहिती देताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र प्रशांत चा मृत्यू कसा झाला? त्यामागे कोण आहेत त्याची आत्महत्या आहे की हत्या आहे हे सर्व प्रश्न सद्ध्या गुलदस्त्यात असून पोलीस तपासानंतर याचा उलगडा होणार आहे.

Previous articleपोलीस पंचनामा :- पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला रँगेहत पकडले
Next articleधक्कादायक :- तलाठी ई-पीक पेरा भरण्यासाठी गेले शेतावर पण लिंकच गायप ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here