Home वरोरा धक्कादायक :- तलाठी ई-पीक पेरा भरण्यासाठी गेले शेतावर पण लिंकच गायप ?

धक्कादायक :- तलाठी ई-पीक पेरा भरण्यासाठी गेले शेतावर पण लिंकच गायप ?

 

शेतकऱ्यांनी व्यक्त केला शासनव्यवस्थेवर रोष, तलाठी हतबल?

ता.प्र (किशोर डुकरे) :-

शासनाने नव्याने शेतकऱ्यांच्या शेतातील शेत पिकाचा ई-पेरा नोंद करण्याची पद्धत अवलंबली आहे मात्र वरोरा तालुक्यातील तलाठी साझा क्र 24 येथील तलाठी गणेश डी कौरती हे आज आसाळा या गावाला येऊन शेतकऱ्यांना e पीक पेरा फॉर्म कसे भरायचे याबाबत मार्गदर्शन केले तसेच काही शेतकऱ्याचा बांधावर जाऊन फॉर्म भरून दिले परंतु त्या शेतावर अर्धा तास थांबून सुद्धा लिंक नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या या ई-पेरा पद्धतीवर रोष व्यक्त केला आहे.

महत्वाची बाब म्हणजे या ई-पेरा फॉर्मची मुदत मोजक्या दिवसाची असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.त्यामुळे शासनाचा या ई -पेरा पद्धतीने लिंक नसल्याने पीक पेरा नोंद होत नसल्याने या फॉर्मची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी याप्रसंगी केली आहे.

यावेळी आसाळा येथील राजू डुकरे यांच्या शेतीवर जाऊन याबाबत माहिती देण्यात आली आहे यावेळी साझा क्र येथील तलाठी कौरती कोतवाल, राजू चांदेकर आणी गावातील जास्तीत जास्त शेतकरी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here