Home वरोरा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके यांचा कृतज्ञता सोहळा थाटात संपन्न.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके यांचा कृतज्ञता सोहळा थाटात संपन्न.

 

विविध सामाजिक संघटनेकडून गजानन शेळके सन्मानित.

वरोरा प्रतिनिधी : –

वरोरा येथील कटारिया मंगल कार्यालयात नुकताच सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांचा कृतज्ञता सोहळा थाटात संपन्न झाला. गजानन शेळके नियत वयोमानानुसार आॅगस्ट 2021 ला सेवानिवृत्त झाले. लोकमान्य विद्यालय वरोरा येथे 1992 ला मुख्याध्यापक भाऊ पाटील यांच्या कार्यकाळात सामान्य शेतकरी कुटुंबातील गजानन शेळके साहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले.

दहा मुख्याध्यापकांचे कार्यकाळात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ते अकरावे मुख्याध्यापक म्हणून 2016 ला त्यांनी पदभार स्वीकारला व नंतर लोकशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनात प्रबळ इच्छाशक्ती आणि अनुभवातून शालेय प्रशासनात एकसूत्रता, क्रीडा, सांस्कृतिक, शालेय पायाभूत सुविधा, निकाल, विद्यार्थी संख्या, शिस्त, पालक, विद्यार्थी व शिक्षण विभागाशी समन्वयातून घट्ट नाते जोडले. शिक्षक संघटनेच्या प्रदीर्घ अनुभवातून अनेक शिक्षक, मुख्याध्यापकांचे प्रश्न मार्गी लावले. समाजाचे, कुटुंबाचे काही देणे लागते या भावनेने कुटुंब व समाजासाठी कष्ट व संघर्षातून भरीव कार्य केले. अशा शांत, संयमी मनमिळावू स्वभावाने सर्वांना आपलेसे केले. यांच्या आयोजित कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष वरोरा लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील यांनी गजानन शेळके यांच्या सेवेतील केलेल्या कार्याबद्दल प्रसंशा करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागो गाणार शिक्षक आमदार नागपूर विभाग, योगेश बन कार्यवाह नागपूर विभाग मराशिप, विनोद पांढरे संघटक नागपूर विभाग मराशिप, मधुकर मुप्पीडवार जिल्हा अध्यक्ष मराशिप चंद्रपूर, जेष्ठ साहित्यिक आचार्य ना गो थुटे सचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा,कैलास उराडे अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चंद्रपूर, विलास कावलकर मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय वरोरा ईत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.या प्रसंगी गजानन शेळके यांचा विविध सामाजिक संघटनेकडून सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी वूंद, मराशिपचे जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव अन्य माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक, शिक्षक, धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय जीवनातील मित्र परिवार तसेच शहरातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल राखे यांनी व आभार प्रदर्शन विलास खोंड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान सौ. सरोज कथडे यांच्या मधुर वाणीने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here