Home क्राईम स्टोरी खळबळजनक :- एका नराधमांने केला 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार,

खळबळजनक :- एका नराधमांने केला 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार,

 

पुण्यातील ३९ वर्षाच्या रिक्षा चालक या नराधमाला अटक.

पुणे न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती यासह आता लहान मुलींची सुरक्षा धोक्यात आली असून पुणे स्टेशन परिसरातील ३९ वर्षाच्या रिक्षा चालकाने एका ६ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला असल्याची खळबळजनक बाब समोर आल्याने सर्वाना पुण्यातील जनतेला मोठा धक्का लागला आहे.या नराधम रिक्षा चालकाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्याकडेला आईच्या शेजारी झोपलेल्या या चिमुकलीला रात्री नराधम रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

दिवसेंदिवस बलात्काराचे प्रकार घडत असल्याने समाजमन सुन्न होत आहे, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईच्या शेजारी झोपलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला रात्री १ च्या सुमारास रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर तिला रिक्षात घालून मार्केट यार्ड परिसरात नेण्यात आले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान चिमुकलीच्या आईला जाग आली असता तिच्या शेजारी झोपलेली मुलगी गायब असल्याचे दिसली. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध सुरु केला. यावेळी सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात दिसला. त्यानंतर पोलिसांनी मार्केट यार्ड गाठत आरोपीला शोधून त्याला अटक केली. सध्या या अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleसेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन शेळके यांचा कृतज्ञता सोहळा थाटात संपन्न.
Next articleखळबळजनक :- घरोघरी पूजा करणारा पुजारीच निघाला घरफोड्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here