Home महाराष्ट्र खळबळजनक :- घरोघरी पूजा करणारा पुजारीच निघाला घरफोड्या?

खळबळजनक :- घरोघरी पूजा करणारा पुजारीच निघाला घरफोड्या?

 

एकीकडे पूजा तर दुसरीकडे रेकी. चोरीची पद्धत ऐकून सगळेच चकित?

पुणे न्यूज वार्ता :-

सत्यनारायण यासह विविध पूजा सांगण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या व तिथली माहिती मिळवून घरफोड्या करणाऱ्या पुजाऱ्याला व त्याच्या महिला साथीदारांना पुण्यातील वारजे पोलिसांनी अटक अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील पौराहित्य करणाऱ्या पुजार्यानी महिला साथीदारांच्या मदतीने वारजेसह, उत्तमनगर आणि आळंदी येथे पाच घरफोड्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे पोलिसांनी या पुजाऱ्यासह त्याच्या दोन महिला साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोने, चांदी आणि रोख रक्कम असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील वारजे परिसरातील एका दांम्पत्याच्या घरात चोरी झाली होती तसेच वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपास अधिकारी व उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, पोलिस नाईक अमोल राऊत आणि गोविंद फड यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी पद्माकर भगवानराव जोशी (वय ४६, रा. धायरी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आणि त्याच्या साथीदार महिला अर्चना सुधीर खाडे (वय ४०, रा. आळंदी) आणि नीलिमा नितीन जोशी (वय ४४, रा. आळंदी) यांनी वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, तर आळंदी, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा पाच घरफोड्या केल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून सोने, चांदी आणि रोख रक्‍कम असा एकूण ३३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, पोलिस नाईक गोविंद फड, अमोल राऊत, अमोल काटकर, पोलिस शिपाई बाळू शिरसाठ, रमेश चव्हाण, अजय कामठे, नितीन कातुर्डे आणि विजय भुरूक यांनी ही कारवाई केली.

एकीकडे पूजा; दुसरीकडे रेकी?

पुजारी असलेला आरोपी पद्माकर जोशी हे पौराहित्य करायचे. त्यामुळे पूजेसाठी ते अनेकांच्या घरी, दुकानात किंवा कार्यालयात जात असत. त्यावेळी ते त्या ठिकाणी रेकी करत असत. गप्पा मारतानाही ते आवश्यक ती माहिती मिळवीत असत, अशी माहिती वारजे पोलिसांनी दिली.

महिला फिरायच्या घराच्या शोधात.

घरफोड्या गुन्ह्यात अडकलेल्या अर्चना खाडे आणि नीलिमा जोशी या घर भाड्याने घ्यायच्या बहाण्याने ठिकठिकाणी चौकशीसाठी जात असत. त्यावेळी संबंधित इमारतीत सुरक्षा आहे किंवा नाही; तसेच आसपासच्या परिसराची माहिती या दोघी घेत असत. त्यातूनच कोठे घरफोडी करायची, याचा निर्णय ते तिघे मिळून घेत होते, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here