स्वतःच्या धाब्यावर जुगार खेळ पडला महागात. लाखो रुपये लुटले असल्याचा सुद्धा आरोप.
वरोरा प्रतिनिधी :-
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या वरोरा येथील धाब्यावर मागील दोन दिवसापूर्वी जुव्वा भरवला होता तो जुगार जवळपास 10 लाखांचा असल्याची चर्चा असून पाटाला माजरी परिसरातील एका प्रतीक पारखी नामक वेकोली कर्मचारी यांनी या जुगारात जवळपास 8 लाख रुपये जिंकले होते. पण हे पैसे जिंकल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते आणि त्यांचे इतर सहकारी यांनी प्रतीक पारखी यांना मारहाण करून त्याच्या जवळचे पैसे हिसकावून त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती असून जबर जखमी झालेल्या प्रतीकला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र ते वेकोली कर्मचारी असल्याने त्यांना परत वेकोली मांजरी च्या रुग्णालयात दाखल केले पण प्रक्रुती चिंताजनक असल्याने नागपूर च्या रुग्णालयात त्याना काल भरती करण्यात आल्याची माहिती असून पोलिसांनी या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह त्यांच्या पाच सहकारी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुखांना स्वताच्या धाब्यावर जुगार भरविण्याची परवानगी दिली कुणी? हा गंभीर प्रश्न असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी अशा प्रकारचे जुगार क्लब भरवून त्या ठिकाणी पैसे जिंकणाऱ्यांचे पैसे लुटत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? हा प्रश्न आता सत्ताधारी यांना या घटनेच्या निमित्याने जनता विचारत आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख पाठोपाठ उपजिल्हा प्रमुख पण सामील?
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या धाब्यावर त्या दिवशी जुगार सुरू होता तिथे उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम हे सुद्धा उपस्थित होते पण साहेब मी त्या ठिकाणी नव्हतो माझे नाव तक्रारीत टाकू नका माझी नौकरी जाईल अशी विनंती ठाणेदार खोब्रागडे यांच्याकडे रमेश मेश्राम यांनी करून त्यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची पण माहिती आहे.पण पोलीसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्याचं धाडसत्र सुरू केल्याने या प्रकरणात नेमके किती आरोपी आहे हे येत्या चोवीस तासात समोर येणार आहे.