मित्रानेच केला मित्राचा गेम, कसा कुणावर विश्वास ठेवायचा याचा कुणी सांगेल का नेम?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात आता अवैध धंदेवाईक यांच्याकडे आपले शौक पूर्ण करण्यासाठी सुपारी घेण्याचे काम सुरू केले असून यामुळे गुन्हेगारी वेगळ्या पद्धतीचे वळण घेत आहे. चंद्रपूर शहरातील मित्र नगर येथील अनेक गुन्हेगार आपले सावज शोधत असतात पण त्यांच्याच परिसरात बाहेरील एखाद्याचा व्यक्तीचा खून व्हावा ही बाब पहिल्यांदाच घडली आहे.
चंद्रपूर मधील दुर्गापुरात मित्राने मित्राचा दारूच्या नशेत खून केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. ती शाई वाळत नाही तोच आता शहरातील मित्र नगर मधे मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे,
आरोपी शुभम साखरकर रा. तिरवंजा तालुका भद्रावती व मृतक संकेत सुमटकर हे मित्रच होते.मात्र संकेत व आरोपीं शुभम मध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला असल्याने त्याचा राग शुभमने मनात ठेवत अगोदरच गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगार संगम सागोरेला सोबत घेत मित्रनगर परिसरात 8 सप्टेंबरला संकेत सुमटकर या युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. विशेष म्हणजे ज्यावेळी ही हत्या झाली त्यावेळी आरोपी व मृतक हे दारूच्या नशेत होते.
मित्रनगर भागात पडक्या क्वार्टर मध्ये संकेत चा मृतदेह आढळला.
आरोपीनी संकेत चा मृतदेह मित्रनगर परिसरातील निर्जन भागात लपवून ठेवला होता दरम्यान 10 सप्टेंबर ला आरोपी संगम याने स्वतः पोलिसांना संपर्क साधत मित्रनगर परिसरात युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती दिली, संगम हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला, पोलिसांनी संगम ला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केली असल्याचे कबूल केले. 2 दिवसापासून संकेत घरी न आल्याने त्याचा मोठा भाऊ सुहास सुमटकर संकेत बेपत्ता असल्याची तक्रार करणार होता मात्र पोलिसांचा त्याआधी फोन आला व संकेत चा मृतदेह मिळाला अशी माहिती सुहासला दिली. सुहासने पोलिसांना माहिती दिली की 8 सप्टेंबरला संकेत हा आरोपी शुभम सोबत पडोली येथे पार्टी आहे आम्ही जाऊन येतो असे सांगत घरून निघाला होता. मात्र संकेत चा गेम त्याचा मित्र शुभम करणार असल्याची त्याला मुळीच कल्पना नव्हती.
रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मित्रनगर भागात राहणारा आरोपी संगम सागोरे यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, अवैध दारू, दादागिरी, मारहाण अश्या अनेक तक्रारी मित्रनगर भागातील नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये केल्या होत्या हे विशेष.